Chitra Wagh : सचिन वाझेवरून चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल; म्हणाल्या, वसुली गँगची...

Chitra Wagh On Sachin Waze Allegations : "सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे."
Chitra Wagh, Uddhav Thackeray, Sachin Waze
Chitra Wagh, Uddhav Thackeray, Sachin WazeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 August : 'सचिन वाझेने (Sachin Waze) अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे,' अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप केला आहे. याच आरोपामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

वाझेच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि भाजप नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वाझे प्रकरणावरुन त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

Chitra Wagh, Uddhav Thackeray, Sachin Waze
Amol Mitkari Vs MNS : मिटकरी अन् साबळेंमुळे जय मालोकारचा मृत्यू; ठाकरेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा

चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, "सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी.

निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती.

Chitra Wagh, Uddhav Thackeray, Sachin Waze
Video Anil Deshmukh : वाझेचे आरोप अन् अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, देवेंद्र फडणवीस...

सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिक माहिती देतील का?" याची आम्ही वाट पहातोय, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com