मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. काँग्रेसची (Congress) पहिल्या पसंतीची ३ मत फुटल्याने त्यांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. तर दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप हे दुसऱ्या आणि तिसऱ्या मतांच्या फेरीवर विजयी झाले आहेत. भाजपचे (BJP) पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दुसऱ्या फेरीत विजय झाला आहे. (MLC Election 2022 Latest Marathi News)
काँग्रेसची ३ मत फुटल्याने त्यांचा पहिल्या फेरीत एकही उमेदवार विजयी होवू शकला नव्हता. पहिल्या फेरीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ मत मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मत मिळाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर भाई जगताप यांना दुसरा पसंती क्रम असल्याने मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला.
विधान परिषद निकालात पहिल्या फेरीत अक्षेप्रमाणे भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २ शिवसेनेचे (Shivsena) २ उमेदवार विजयी झाले. पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे विजयी झाले. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले.
पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर यांना २९, राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय यांना ३० आणि उमा खापरे यांना २७ मत मिळवत विजय नोंदवला. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनाही प्रत्येकी २६ मत मिळाली. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांना पहिल्या पसंतीची २८ मत मिळाली. तर खडसे यांना २९ मत मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.