खडसे, अहिर, राम शिंदे, खापरे, भारतीय यांचा विजयाचा गुलाल...

Vidhan Parishad Election : प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात कांटे की टक्कर
eknath Khadse | Uma Khapre | Sachin Ahir | Aamshya padawi
eknath Khadse | Uma Khapre | Sachin Ahir | Aamshya padawi Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने (Congress) भाजपच्या (BJP) दोन मतांवरचा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर तब्बल २ तासांनंतर मतमोजणीला सुरवात झाली. यात पहिल्या फेरीचा निकाल घोषित करण्यात आला असून अक्षेप्रमाणे भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २ शिवसेनेचे (Shivsena) २ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसची मत फुटल्याने अद्याप काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी होवू शकलेला नाही. तर प्रसाद लाड यांचाही अद्याप निकाल प्रलंबित आहे. (MLC Election 2022 Latest Marathi News)

पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. (MLC Election 2022 Latest Marathi News)

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर यांना २९, राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय यांना ३० आणि उमा खापरे यांना २७ मत मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनाही प्रत्येकी २६ मत मिळाली आहेत. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांना पहिल्या पसंतीची २८ मत मिळाली. तर खडसे यांना २९ मत मिळाली.

काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना केवळ २२ मत मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मत मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची किमान ३ मत फुटली आहेत. याशिवाय त्यांना बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पक्ष यांचीही मत मिळाली नसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com