Congress Leaders Sarkarnama
मुंबई

Congress News : मोठी बातमी: महाराष्ट्रात काँँग्रेसचं 'मराठा' कार्ड..! पटोलेंनंतरचा प्रदेशाध्यक्षपदाचा चेहरा ठरला? लवकरच घोषणा

Maharashtra Congress President : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार,यशोमती ठाकूर,सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख यांच्य़ा नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की तरुण नेत्यांना संधी द्यायची असा पेच काँग्रेस हायकमांडसमोर निर्माण झाला असल्याचे बोलले जात होते. पण....

Deepak Kulkarni

New Delhi News : लोकसभेतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. शंभरपेक्षा जास्त जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या 16 जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडकडे पाठवला होता. त्यानंतर पटोलेंनंतर प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. अशातच आता काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार,यशोमती ठाकूर,सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख यांच्य़ा नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की तरुण नेत्यांना संधी द्यायची असा पेच काँग्रेस (Congress) हायकमांडसमोर निर्माण झाला असल्याचे बोलले जात होते. पण अखेर तरुण नेत्यालाच या पदावर संधी देण्याच्या विचारात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आहेत.

महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नावावर हाय कमांड कडून विचार सुरु अमित देशमुख यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून अमित देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कारण सतेज पाटलांनी यापूर्वीच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणावर पकड ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाला नकार कळवल्याची देखील माहिती समोर आली होती.

महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या दोन मुरब्बी राजकीय नेत्यांशी कधी जुळवून तर कधी बेधडक वागत नाना पटोलेंनी आपलं राजकीय चातुर्य गेले 4 वर्ष दाखवलं होतं. त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दमदार यशही मिळवून दिलं होतं. त्यामुळे साहजिकच नानांचं महाराष्ट्रातलं वजन वाढलंच तसंच दिल्लीतही त्यांचा दबदबा वाढला. पण विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावरच महाराष्ट्राची जबाबदारी कायम ठेवली. यश मिळालं तरी नेतृत्व बदलण्याची भाजपसारखी धमक काँग्रेसनं दाखवली नाही.

नाना पटोलेंनी महायुतीसह महाविकास आघाडीलाही शिंगावर घेतलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी जागावाटपात कोणतीही नमती भूमिका न घेता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रसंगी राजकीय कटुता घेत काँग्रेसच्या पारड्यात जास्तीत जास्त जागाही पाडून घेण्यातही त्यांना यश आलं.

पण विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या विरोधात अनपेक्षित व तितकाच धक्कादायक निकाल लागला. महाविकास आघाडीची दाणादाण उडाली. 288 जागा लढलेल्या आघाडीला अवघ्या 49 जिंकता आल्या. त्यात काँग्रेसला तर फक्त 16 जागांवरच विजय मिळवता आला. यामुळे काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष बदलाचं मनावर घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT