Congress Leaders meet Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Congress Leaders Meet Sharad Pawar : काँग्रेसचे प्रभारी आणि नेते शरद पवारांना भेटले; विरोधी पक्षनेतेपदाबाबत केले भाष्य...

त्या बैठकीत पक्ष फुटल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असल्याची ग्वाही पवार यांना देण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politic's : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि राज्यातील काँग्रेस नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले आहेत. आगामी काळात एकत्रितपणे महाराष्ट्रात लढण्यासाठी पवार यांचे मार्गदर्शन आम्हाला अपेक्षित आहे. तसेच, विरोधी पक्षनेतेपदाबाबत आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. (Congress in-charges and leaders meet Sharad Pawar)

राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ देण्याबाबतची भूमिका घेण्यात आली आहे. शरद पवार यांना पक्षातूनच धोका मिळाला आहे. याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली, त्यामुळे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याची काँग्रेसची भूमिका राहणार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

दरम्यान, बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची वाय. बी. सेंटर येथे जाऊन भेट घेतली. त्या बैठकीत पक्ष फुटल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असल्याची ग्वाही पवार यांना देण्यात आली. तसेच, आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याबाबत पवारांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलो आहोत, असेही नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या आजच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याबाबत चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ठरविण्यात येणार आहे. आमची भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचीच आहे. त्यामुळे या दोघांशी चर्चा करूनच विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घेणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT