Prajakt Tanpure meet Ajit Pawar : जयंत पाटलांना मोठा धक्का; सख्खे भाचे प्राजक्त तनपुरेंनी घेतली अजित पवारांची भेट

तनपुरे यांनी अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
Ajit Pawar-Prajakt Tanpure-Jayant Patil
Ajit Pawar-Prajakt Tanpure-Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमधे सहभागी झाला आहे. त्यानंतर शरद पवारांच्या गटात किती आमदार आहेत, यावर मोठी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांसोबत निश्चित राहतील, असे मानले जात होते. मात्र, त्यांनी ता. ४ जुलै सकाळीच अजित पवारांची भेट घेतल्याने मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. हा जयंत पाटलांना मोठा धक्का मानला जात आहे. (MLA Prajakt Tanpure meet Ajit Pawar)

नगर (Nagar) जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार आहेत. यातील कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत असल्याचे खात्रीने सांगितले जात होते. नगरचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या सोबत आणि पारनेरचे आमदार नीलेश लंके, अकोल्याचे आमदार किरण लहामटे हे द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसले.

Ajit Pawar-Prajakt Tanpure-Jayant Patil
Baramati BJP Banner News : भाजपकडून अजित पवारांच्या अभिनंदनाचे फलक; बारामतीत मोदी, शाह आणि नड्डांसह झळकले बॅनरवर...

कार्यकर्त्यांशी चर्चा करून आमदार लंके आज (ता. ४ जुलै) निर्णय घेणार आहेत, तर मुंबईतील पाच जुलैच्या बैठकीवेळी निर्णय घेऊ, असे आमदार लहामटे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे विदेशात असले तरी ते अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जातील, असे बोलले जातेय.

आमदार रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू असून घडामोडी सुरू झाल्यापासून ते सतत शरद पवारांच्या सोबत दिसून आले आहेत. सातारा दौऱ्यातही ते शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते. तिथे त्यांनी पत्रकार परिषदही घेतली.

Ajit Pawar-Prajakt Tanpure-Jayant Patil
Konkan NCP News : रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अजितदादांसोबत; म्हणाले, परिणाम काय होईल तो होईल...

जयंत पाटील यांचे भाचे असलेले प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या सोबतच राहतील, असे राजकीय विश्लेषक छातीठोकपणे सांगत होते. मात्र, आज (४ जुलै) त्यांनी सकाळीच अजित पवार यांची भेट घेतल्याने मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. तनपुरे यांनी अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी मतदारसंघात पाथर्डी-नगर तालुक्याचा बराचसा भाग आहे. तीन तालुक्यांत विस्तारलेला त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. यात नगर, पाथर्डी तालुक्यातील भागात भाजपचे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी शिवाजी कर्डीले हे तगडे प्रतिस्पर्धी आहेत. सन २०१९ मध्ये झालेला पराभव कर्डीले यांना धक्का देणारा होता. मात्र, त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील तीनही तालुक्यांत मोठी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. त्यांच्या जोडीला भाजप खासदार सुजय विखे यांचे खंदे समर्थन आहे.

Ajit Pawar-Prajakt Tanpure-Jayant Patil
Ajit Pawar :आमच्या ९ आमदारांना नोटीस काढण्याचा अधिकार जयंत पाटलांना नाही; पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर ; अजितदादा

एकूणच २०२४ ची विधानसभा निवडणुक ही कर्डीले यांनी विखेंच्या साथीने जिंकून आणण्याचा चंग बांधलेला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीत पुन्हा निवडून यायचे असेल तर अजित पवार यांच्या सोबत जाणे अशी राजकीय अपरिहार्यता प्राजक्त तनपुरे यांच्या समोर आहे. त्यातून एकूण राजकीय भवितव्याचा विचार करून तनपुरे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असावा, अशी शक्यता आहे.

प्राजक्त तनपुरे अजित पवार गटात सामील झाले, तर भाजपच्या शिवाजी कर्डीले यांची मोठी अडचण होणार आहे. त्यांना उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या पुढे आणि कार्यकर्त्यांत निर्माण होणार आहे. महत्वकांक्षी असलेले कर्डीले हे काय भूमिका घेणार, याचीही उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com