Baba Siddique | Zeehan Siddique Sarkarnama
मुंबई

Baba Siddique News: देवरांनंतर सिद्दीकी पितापुत्र काँग्रेस सोडणार? अजितदादा गटातील प्रवेशाबाबत बाबा सिद्दीकी म्हणाले...

Baba Siddique Will Join Ajit Pawar Group :मुंबईत काँग्रेसला मोठा दुसरा धक्का बसण्याची शक्यता

Mangesh Mahale

Baba Siddique & Zeeshan Siddique News: काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काही दिवसापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मुंबईत दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी पितापुत्र अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

सिद्धीकी हे पितापुत्रांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चमुळे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ बाबा सिद्धीकी यांच्या रुपात मुंबईत काँग्रेसला मोठा दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. बाबा सिद्धीकी अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण 'मी इतर पक्षात जाण्याचा तुर्तास कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर काही घडत असेल तर मी अधिकृतरित्या सांगेल,' असे स्पष्टीकरण बाबा सिद्धीकी यांनी दिले आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार गटात गेले तर या प्रवेशामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व येथील आमदार आहे. ते आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार आहेत. १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मुंबई काँग्रेसमधील महत्वाचे नेते म्हणून बाबा सिद्दीकी महत्वाचे नेते मानले जातात. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. झिशान सिद्दीकी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT