Balasaheb Thorat Resigned News Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thorat: मोठी बातमी! कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्यांंनी राजीनामा दिला असावा असा अंदाज आहे

सरकारनामा ब्युरो

Balasaheb Thorat News: कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीमाना दिल्याची माहिती समोर येत आहेत. बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्यांंनी राजीमामा दिला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. थोरात यांच्या राजीनाम्याने मात्र कॉंग्रेसमधील अंर्तगत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हा कॉंंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कॉंग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधन निवडणुकीत बंडखोरी केल्यापासून बाळासाहेब थोरात यांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

थोरात यांनी आपल्या पत्रात कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात राजीनामा दिल्याचा उल्लेख केला आहे. तसेच, प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं भूमिराकाही त्यंनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्रातून मांडली आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आमच्यापर्यंत आलेला नाही, ते आमच्याशी काहीही बोललेले नाही. ते आमच्या संपर्कात नाहीत. बाळासाहेबांचे पत्र दाखवा, तरच विश्वास ठेवेन, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच, भाजपला कॉंग्रेसमुक्त भारत करायचा आहे. म्हणून त्यांचे हे सर्व सुरु आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

थोरात यांनी आपला राजीनामा कॉंग्रेस हायकमांडकडे सुपूर्द केला आहे. मात्र कॉंग्रेस हायकमांड थोरात यांची मनधरणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच आगामी निवडणूका आणि विधीमंडळाचे अधिवेशन या गोष्टींचा विचार करता बाळासाहेब थोरात यांच्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT