Chinchwad by-Election: चिंचवडच्या निवडणुकीत रंगत : आघाडीत बिघाडी; राहुल कलाटे अपक्ष लढणार !

कलाटे यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Rahuk Kalate
Rahuk KalateSarkarnama News

Chinchwad by-Election Politics : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्यावतीने या पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाना काटे आणि भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांच्यात थेट लढत होईल असे वाटत असताना या निवडणुकीत आता पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे.

शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचं सरकारनामाशी बोलताना सांगितलं. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. सरकारनामाची बोलताना कलाटे म्हणाले, ''महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, मला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. त्यामुळे मलाच मतदार सहानुभूती दाखवतील असा विश्वास मला आहे.''

Rahuk Kalate
MVA News: ...म्हणून महाविकास आघाडीतील १९ नगरसेवक भाजपात प्रवेश करणार, 'या' नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

कलाटे यांनी 2014 ची विधानसभा शिवसेनेकडून तर 2019 ची विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढली होती. या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कलाटे यांनी कडवी झुंज दिली होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक असलेले कलाटे यांच्याकडे पिंपरी चिंचवड मधील शिवसेनेचे गटनेतेपद आहे. कलाटे यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com