nana patole eknath shinde sarkarnama
मुंबई

Nana Patole : "मुख्यमंत्री सिरीयस माणूस नाही; खुर्ची, भ्रष्टाचार अन्...", नाना पटोले बरसले

Mumbai Hit And Run Case : मुंबईतील वरळी 'हिट अ‍ॅण्ड रन' केस प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर खरमरी टीका केली आहे.

Pradeep Pendhare

मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील सिरियस माणूस नाही. महाराष्ट्रातील पहिला, असा मुख्यमंत्री आहे की, त्यांना महाराष्ट्रातील कुठल्याही घटनेचे देणे-घेणे नाही. खुर्ची, भ्रष्टाचार आणि कटकारस्थान करणे एवढीच त्यांची जबाबदारी आहे, असा घाणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केला.

मुंबईच्या वरळीमधील 'हिट अ‍ॅण्ड रन' केस प्रकरणावरून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना लक्ष केले. सिरीयस नसलेला मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

मुंबईच्या वरळी येथील 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा नेत्याच्या कारने हा अपघात झाला आहे. या अपघातामधील मुख्य आरोपी पसार असल्याने यामागे राजकारण होत असल्याची टीका होत आहे. मुख्य आरोपी हा वरळीतील एका पबमधून बाहेर पडला होता. त्याने तेथे मद्यसेवन केल्याचे बिल देखील समोर आले आहे. मुख्य आरोपीला पसार होऊन 24 तास होऊन गेले आहेत. त्यामुळे त्याचा वैद्यकीय अहवालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यावरून कुठे काही राजकारण सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. यातच नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

"मुख्यमंत्री हा काही सिरीयस माणूस नाही. महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री असा आहे, की त्यांना महाराष्ट्रातील कुठल्याही घटनेचे देणे घेणे नाही. आपली खुर्ची, भ्रष्टाचार आणि कटकारस्थान करणे एवढेच त्यांचे उद्योग आहेत," अशी टीका करत नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

"दोन वर्षांपूर्वी मी कसा कॅच घेतला. कशी विकेट काढली. मी कसे 50 आमदार फोडले, असं मुख्यमंत्री शिंदे सांगत आहेत. म्हणजेच कट करणे हे त्यांच्यासाठी गौरवास्पद आहे. अभिमानास्पद आहे. अशा प्रकारचा मुख्यमंत्री आपल्या चुकीच्या मानसिकतेचा गौरव करत असेल, तर महाराष्ट्राच्या चाव्या चुकीच्या माणसाच्या हातात दिल्याचे दिसते," असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

"या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचार रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीत घेऊन जायचा आहेत. निविदा प्रसिद्ध झाली आहे. पूर्वीपेक्षा 40% भावाने वाढीव निविदा प्रसिद्ध झाली आहे. 1000 कोटी रुपयांचे काम असेल, तर 400 कोटी वरच्या वर, अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार सुरू चालू आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला.

"सत्ताधारी राज्याच्या पैशाची लूट करून सर्वसामान्यांना महागाईमध्ये लोटत आहेत. त्यामुळे चुकीच्या माणसांच्या हातामध्ये सरकार असून हे भाजप प्रणित सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांना कळू लागले आहे," असेही नाना पटोले यांनी म्हटले.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT