Video Devendra Fadnavis : महायुतीच्या विधानसभेला किती जागा येणार? फडणवीसांनी ठोसपणे सांगितला आकडा

Devendra Fadnavis On Assembly Election : लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत, असं म्हणत फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

लोकसभेत महाविकास आघाडीनं आस्मान दाखवल्यानंतर महायुती कामाला लागली आहे. विधानसभेच्या दृष्टीनं महायुतीचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांची आकडेवारी सांगत किती जागा निवडून येतील, याचं गणित मांडलं आहे.

विरोधकांची आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. आपण निर्धार केला आणि किमान 20 लाख मते जास्त घेतली तर 200 जागा येतील, असा कॉन्फिडन्स देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागू होतो. लोकसभेत महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) म्हणते आमचा विजय झाला. विरोधकांची आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. आपण निर्धार केला आणि किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील."

"आपण गाफील राहिलो"

"लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटे बोलत होते मात्र आपणही गाफील राहिलो. 'फेक नरेटिव्ह' या चौथ्या विरोधकाशी लढावे लागले," असं फडणवीसांनी सांगितलं.

devendra fadnavis
Video Devendra Fadnavis : कधी नव्हे ते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले; 'खुमखुमी असेल तर...'

"विरोधकांना खोटे बोलायची चटक"

"सत्य चिरकाल जिवंत राहते. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल. दुसरी नाही. विरोधकांना खोटे बोलायची चटक लागली आहे. विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही माहिती नाही. सकारात्मकतेने योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर पराभव शक्य नाही. आपण योजनांची माहिती देतो अन् ते सकाळी काही तरी वेडंवाकडं बोलतील, माध्यमे तेच दाखतील. सातत्यानं चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे," असा सल्ला फडणवीसांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

devendra fadnavis
Devendra Fadnavis : राज्यात तीन नाही तर चार विरोधक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं चौथ्याचे नाव...

गाफील राहू नका...

"एकदा आपल्याला मार पडला असून गाफील राहू नका. आता ताकही आपल्याला फुंकून प्यावे लागेल. विरोधकांचा खोटा प्रचार मोडून काढाल," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com