Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या शिलेदाराचं जुनं प्रकरण नाना पटोले उकरून काढणार

Pooja Chavan death case shivsena leader Sanjay Rathod: पुण्यातील वानवडी भागातील एका इमारतीतून उडी घेत पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्या.

Jagdish Patil

पुण्यातील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील मंत्र्यावर कारवाई करा, अन्यथा पुण्यातील त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यामूळे आता पुण्यातील बहुचर्चित पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोप असणारे संजय राठोड यांचे मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे प्रकरण मांडणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

"मंत्रिमंडळामध्ये जो मंत्री आहे त्याला क्लीन चिट दिली आहे. सरकार या मंत्र्याला पाठीशी घालत आहे. मी पत्र देऊनसुद्धा पोलिस त्याला उत्तर देत नाहीत. त्यामुळे सरकार प्रशासनावर दबाव टाकत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि असे नसेल तर मग त्या मंत्र्याचा राजीनामा घ्या, अन्यथा अधिकाऱ्याचे निलंबन करा" असे नाना पटोले यांनी सांगितले.शिंदे-फडणवीस-पवार सरकार त्या मंत्र्याला (संजय राठोड) पाठीशी घालत असून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

नेमकं काय आहे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यात चांगलचं गाजलं होतं. पुण्यातील वानवडी भागातील एका इमारतीतून उडी घेत पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्या. ज्यामधे तत्कालीन शिवसेना मंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं.

पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत, असा आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला होता. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणाऱ्या चित्रा वाघ यांच्याच भाजप सरकारमध्ये सध्या राठोड हे मंत्री आहेत. त्यामुळे आता विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT