Kdmc News : भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने साडी घातली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वाद सुरु झाला आहे. काँग्रेसचे डोंबिवलीमधील ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केली होती. त्यानंतर भाजपा पदाधिकारी संतप्त झाले होते.
प्रकाश पगार म्हणाले, आपल्याला एक पोस्ट आली ती मी केवळ आपण व्हायरल केली. त्यांनी मला खोटं सांगून बोलावून घेऊन मला जबरदस्ती साडी नेसवली. मला साडी नेसवा अथवा काही ही करा मी काँग्रेसचे काम शेवटच्या श्वासपर्यंत करत राहणार. भाजपच्या गुंडाविरोधात लढत राहणार आहे.
प्रकाश पगारे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर मंगळवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक संदीप माळी यांसह भाजपाच्या शिष्टमंडळाने मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यानंतर प्रकाश पगारे यांना एका ठिकाणी बोलवून त्यांना जबरदस्तीने साडी नेसवली आणि त्यांचा सत्कार केला.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांची विडंबनात्मक बदनामी केली आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे देशातील सर्वोच्च नेतृत्वाचा अपमान होत असून यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपा याचा तीव्र निषेध करतो. याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्ती विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावर काँग्रेसचे नेते संतापले असून कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ज्येष्ठ नागरिकाला अपमानस्पद वागणूक देत हे कृत्य केल्या प्रकरणी आपण कल्याण परीमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकाला अपमानस्पद वागणूक देऊन साडी नेसवणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना अटक करण्यात यावी. यासाठी डीसीपी यांची भेट घेणार आहोत. लोकशाहीची हत्या करण्याचे काम भाजपा कडून सुरु आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम भाजपा करत आहे. बहुजन व दलित समाजाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.
भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब म्हणाले, पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विषयी पोस्ट व्हायरल करून निंदनीय काम केले आहे. त्यांनी ज्या पद्धतीने फोटो व्हायरल केला त्याच पद्धतीने त्यांचा आम्ही सत्कार केला. आमच्या वरिष्ठानांही याविषयी पत्र देऊन आम्ही कल्पना दिली आहे. तसेच मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत पंतप्रधान मोदी यांची बदनामी करणाऱ्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
प्रकाश पगारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साडी घेतल्याचे फोटो होतो. तसेच मीच माझ्या रुपाचे गाणं लावण्यात आले होते. मी पण ट्रेंड फाॅलो करतो असे कॅप्शन या व्हिडिओवर देण्यात आले होते. या व्हिडिओ पाहून भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.