Sanjay Raut : धनंजय मुंडे यांचे काय करायचे ते दिल्लीतून ठरेल; अजित पवारांची यात फारशी भूमिका नाही ! संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut Reaction On Dhananjay Munde Demand : धनंजय मुंडे यांनी मला आता जबाबदारी द्या, अशी विनंती केली. त्यावर अजित पवार यांनी मुंडे यांच्या विनंतीचा पक्ष योग्य विचार करेल आणि निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया दिली.
Sanjay Raut Reaction On Dhananjay Munde  Demand News
Sanjay Raut Reaction On Dhananjay Munde Demand NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. शिवसेना नेते संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणातील निर्णय दिल्लीत होणार असल्याचे सांगितले.

  2. त्यांनी स्पष्ट केले की या प्रकरणात अजित पवारांची फारशी भूमिका नाही.

  3. राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.

Shivsena UBT News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत येथे पक्षाच्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केलेली विनंती आणि त्यावरून राज्याच्या राजकारणात सुरू असलेली चर्चा यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. 'चुकले असेल तर काम धरा, पण आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या', असे साकडे धनंजय मुंडे यांनी तटकरे यांना घातले होते.

यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र धनंजय मुंडे यांचं काय करायचे हे दिल्लीतून ठरेल असा टोला लगावला अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीत बसले आहेत अमित शहांच्या आदेशावरूनच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर करण्यात आले असा दावाही संजय राऊत यांनी केला.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मला आता जबाबदारी द्या ही केलेली विनंती आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विनंतीचा पक्ष योग्य विचार करेल आणि निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळ स्थान मिळणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी यावर भाष्य केले.

Sanjay Raut Reaction On Dhananjay Munde  Demand News
Sanjay Raut : "राहुल गांधींमध्ये जी हिंमत ती पंतप्रधानांमध्ये नाही, 75 वर्षांचे झाले पण..."; संजय राऊतांची मोदींवर टीका

खासदार संजय राऊत यांना या संदर्भात जेव्हा माध्यमाने विचारले तेव्हा धनंजय मुंडे यांचे काय करायचं हे दिल्लीतून ठरेल असा खोचकटोला लगावला. अमित शहा यांच्या आदेशानेच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावून हटवण्यात आले अजित पवार यांची याबाबत फारशी भूमिका होती असं मला वाटत नाही, असा चिमटा ही राऊत यांनी यावेळी काढला.

Sanjay Raut Reaction On Dhananjay Munde  Demand News
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा मंत्रीपदासाठी वशीला व्हाया 'तटकरे टू अजितदादा'!

धनंजय मुंडे यांच्यावर अनेक प्रकरणात आक्षेप आहेत परंतु हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे पक्षाने त्यांना काय काम दिले पाहिजे हा अजित पवार यांचा निर्णय असेल. कोणताही राजकीय पुढारी रिकामा राहत नाही, त्याची सगळी काम होत असतात, असेही संजय राऊत म्हणाले. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाडा दौऱ्यावर होते.

छत्रपती संभाजीनगर येथे माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या पक्षप्रवेशावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी निर्णय घेण्यासाठी आम्हाला दिल्लीला जावे लागत नाही, असा टोला भाजपाला लगावला होता. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या विषयावरून संजय राऊत यांनी मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची मूळ मालक दिल्लीत असतात असे म्हणत अजित पवार यांना दिवस आले आहे.

FAQs

प्रश्न 1. संजय राऊत यांनी धनंजय मुंडे प्रकरणाबाबत काय म्हटले?
निर्णय मुंबईत नव्हे तर दिल्लीत होईल असे म्हटले.

प्रश्न 2. अजित पवारांची यात काय भूमिका आहे?
राऊतांच्या मते अजित पवारांची भूमिका फारशी नाही.

प्रश्न 3. राऊत यांनी नेमकी कोणावर टीका केली?
अजित पवार आणि सरकारवर.

प्रश्न 4. या विधानाचा राजकारणावर काय परिणाम झाला?
राजकीय वाद अधिक तीव्र झाले.

प्रश्न 5. हे प्रकरण कुठल्या पक्षांमध्ये वाद निर्माण करत आहे?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी पक्षांमध्ये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com