Prithviraj Chavan Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

बंडखोर आमदारांना राजभवनात आणण्याचा असा आहे ‘प्लॅन’! पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

एकनाश शिंदे यांच्यासह जवळपास 50 आमदार गुवाहाटीत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Political Crisis

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व इतर जवळपास 50 आमदार सध्या गुवाहाटीत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या सत्तास्थापनेच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. पण त्यांना त्यासाठी राजभवनात यावेच लागणार आहे. त्यादृष्टीने भाजपने एक प्लॅन तयार केल्याचे समजते. या आमदारांसाठी ‘ऑपरेशन एअरलिफ्ट’ भाजपचे नेते काम करत असल्याचे समोर आले आहे. (Prithviraj Chavan Latest News)

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीच एका मुलाखतीत या ऑपरेशनबाबत गौप्यस्फोट केला आहे. गुवाहाटातील आमदार विमानाने मुंबईत आणले जातील. पण ते रस्त्याने राजभवनपर्यंत जायचे झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा निर्माण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याबाबतीत खबरदारी घेतली जाऊ शकते, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ऑपरेशनबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, असं ऐकायला मिळत आहे की, भाजपकडून या ऑपरेशनवर काम केले जात आहे. सर्व बंडखोर आमदारांना विमानाने मुंबईत आणले जाईल. तिथूनही एअरलिफ्ट करून म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे राजभवनात उतरवले जाऊ शकते, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेला दुबळी करून मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा भाजपचा गेमप्लॅन आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपकडून हाच प्लॅन आहे. शिवसेना कमजोर झाल्यानंतर हिंतुत्वाच्या मुद्यावर भाजप अधिक आक्रमक होऊ शकते, असंही चव्हाण यांनी सांगितले. शिवसेनेतील हा अंतर्गत मुद्दा आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याच्याही समस्या होत्या. त्यानुसार ते का भेटू शकत नव्हते, हे ते समजावून सांगत होते, असंही चव्हाण म्हणाले.

दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बंडखोर आमदारांना थेट इशारा दिला आहे. विमानतळापासून विधानसभेत जाणारा मार्ग वरळीतून जातो, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्याविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेऊ शकतात. यापार्श्वभूमीवर चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT