एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो विसरू नका: बंडखोरांना आदित्य ठाकरेंचा इशारा

Aditya Thackeray news| राजकारण म्हटल्यावर लोक बदलतात पण आपल्याच लोकांनी धोका दिला याचे दुःख जास्त आहे.
Aditya Thackeray news|
Aditya Thackeray news|
Published on
Updated on

मुंबई : '' राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेवर भाजपसह अनेक पक्षांचा डोळा आहे. मात्र शिवसेनेने गेल्या 25 वर्षांत मुंबई महानगरपालिकेला कुणाची नजर लावू दिली नाही, आमच्याकडे नवीन उमेदवार आहेत. ज्यांना विरोधात जायचयं त्यांनी राजीनामे देऊन जावे. हिंमत असेल तर सर्व बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक जिंकून दाखवावी, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे. असे इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. (Aditya Thackeray Latest news)

दक्षिण मुंबईतील लाला लजपतराय महाविद्यालयात आयोजित शिवसेना मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. राजकारण म्हटल्यावर लोक बदलतात पण आपल्याच लोकांनी धोका दिला याचे दुःख जास्त आहे. पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असे म्हणावे लागेल. शिवसेनेतून घाण निघून गेली, आता जे होईल ते चांगलेच होईल, असा हल्लाबोलही केला घणाघात करतानाच आता लढा जिंकण्यासाठीच असेल, असा ठाम विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Aditya Thackeray news|
एकनाथ शिंदेंची वेळ निघून गेली, आता निर्णय ठाकरेचं घेतील !

तर ''आयुष्यभर शिवसेनेसोबत राहणार असे म्हणणाऱ्यांनी पक्षाला अचानक दगा दिला. पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. आता शिवसेना-शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत. त्यांची खरी ‘फ्लोअर टेस्ट’ रस्त्यावर, विमानतळावर उतरल्यावर होईल, एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो हे विसरू नका. विधानसभेत जाण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वांना येथून जावे लागेल. असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

काही जण ‘मी पुन्हा, येईन, मी पुन्हा येईन’ म्हणत होते. पण सत्ता गेल्यानंतरही ते बंगला सोडायला तयार नव्हते. पण उद्धव ठाकरेंसारखा मोह नसणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. शब्दाला जागणारा हा माणूस आहे. त्यांच्या कोरोना काळातील कामाचे काwतुक जगभरात झाले. ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’वर जातानाचे दृश्य आणि सध्याच्या स्थितीत शिवसेनेला मिळणारे प्रेम पाहून ‘परिवार’ काय असतो याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com