Sachinsawant | MNS 
मुंबई

भाजपनेच राज ठाकरेंना उघडं पाडलं; सचिन सावंताचा आरोप

BJP| Sachinsawant |MNS| मी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली,"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "मी अयोद्या दौऱ्याची घोषणा करताच अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आजच्या सभेत केला. इतकेच नव्हे तर, "माझी अयोध्या दौऱ्यांची तारीख ज्यांना तारीख खुपली, त्यांनीच हा सापळा रचला. त्यांना आमचं हिंदुत्व, भोंगे झोंबले, म्हणून त्यांनी हे केलं, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

या आरोपांनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज ठाकरेंनी टीकास्त्र डागले आहे. '' राज ठाकरेंनी आज आपल्या भाषणात अयोध्या द ट्रॅप या चित्रपटाची गंभीर कहानी सांगितली आणि या चित्रपटाचा रचेता दुसर तिसरं कोणी नसून भाजपच आहे. हे आज महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे.

आपल्या भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते जर अयोध्येला गेले असते तर तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली असती, त्यांच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, त्यांना जेलमध्ये सडवलं गेलं असत. पण तिथे महाविकास आघाडीचे सरकार नाही. तिथे तर योगी आदित्यनाथांचे म्हणजेच भाजपचे सरकार आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार भाजपच्या सरकारनेच मनसैनिकांना जेलमध्ये सडवलं असतं, हे यातून दिसतं. दूसरीकडे तिथे आंदोलन करणारा भाजपचा खासदार असेल त्यामुळे महाराष्ट्रातून जर कोणी त्यासाठी रसद पुरवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाचाच असू शकतो, इतका गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी जे सांगितलं होतं ते निश्चितपणे सत्य आहे की, मनसेची कुचंबना करण्याचं काम भाजपनेच केलं आहे.

त्यामुळे हिंदूत्त्वाच्या वोट बॅंकेत अजून एक वाटेकरी तयार होत आहे हे कळल्यामुळेच राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेपुर्वीच विश्व हिंदू परिषदेने आणि बजरंग दलाने तिथून काढता पाय घेतला. तर दूसरीकडे उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली. भारतीय जनता पक्ष किती कुटील कारस्थान करु शकतं, हे अयोध्या द ट्रॅप या कहाणीतून निश्चिपणे लोकांच्या समोर आलं असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT