MNS :अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याची रसद महाराष्ट्रातून पुरविण्यात आली ; राज कडाडले

सध्या पावसाचं वातावरण, निवडणुका नसताना उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं ? असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांना टोला लगावला.
raj thackeray
raj thackeray sarkarnama
Published on
Updated on

पुणे : "मी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आजच्या सभेत केला. (raj thackeray latest news)

राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. राज ठाकरे यांचा अयोद्धा दौरा स्थगित झाल्यानंतरची ही त्यांची पहिली सभा होती. या सभेत राज ठाकरे (raj thackeray)काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष होत. या सभेत त्यांनी भाजप, खासदार संजय राऊत, राणा दांपत्य, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

raj thackeray
धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

"सध्या पावसाचं वातावरण, निवडणुका नसताना उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं ? असे म्हणत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. "काहीजण अयोध्या दौऱ्याला विरोध करतायत, माफी मागायला लावणारे गेल्या 15 वर्षांपासून झोपले होते का? असा सवाल उत्तर भारतीय नेत्यांना राज ठाकरेंनी केला.

"माझी अयोध्या दौऱ्यांची तारीख ज्यांना तारीख खुपली, त्यांनीच हा सापळा रचला. त्यांना आमचं हिंदुत्व , भोंगे झोंबले, म्हणून त्यांनी हे केलं. उत्तरप्रदेशातील एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो. माफी मागण्यास सांगतो, हे त्यांना आता कसे आठवलं ? अयोद्धा दौऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलं असते, कार्यकर्त्यांना जेलमध्ये सडवलं असतं. ऐन निवडणुकीच्या वेळी मला कार्यकर्त्यांना गमावायचे नाही. माझी महाराष्ट्राची ताकद मी गमविणार नाही. मी वाटेल ती टीक सहन करण्यासाठी तयार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मी हकनार गमवणार नाही, पण यामुळे चुकीचे पायंडे पडत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.

या सभेलाही पोलिसांनी 13 विशेष अटी घातल्या होत्या. तरीही या सभेत राज ठाकरे जोरदार बॅटिंग केली. सभेत राज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा हा प्रमुख मुद्दा होता. अयोद्धा दौरा स्थगित होण्यामागील कारणे त्यांनी सांगितली. मागील दोन आठवड्यात ज्यांनी ज्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांचा समाचार राज ठाकरे यांनी यावेळी घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com