Varsha Gaikwad and Bhai Jagtap Sarkarnama
मुंबई

Congress News: मोठी बातमी! भाई जगतापांना अध्यक्षपदावरून हटवलं; वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा

Mumbai : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

Political News: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्या जागी आता माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडने मुंबई काँग्रेसमध्ये अचानक केलेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा, आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हायकमांडने मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल केले आहेत. भाई जगताप यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं असून वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी ही निवड केली असून याबाबतचे पत्र त्यांनी जारी केले आहे.

याबरोबरच काँग्रेसने गुजरात आणि पद्दुचेरीमध्ये देखील मोठे बदल केले आहेत. गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तिसिंह गोहिल यांची आणि पद्दुचेरीच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार व्ही.वैथीलिंगम यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे फेरबदल करत केले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसने आता आगामी निवडणुकीच्या अनुंषगाने मोठ्या हालचाली सुरू केल्या असल्याचं बोललं जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT