Indapur News : हर्षवर्धन पाटील यांची पुन्हा बाजी; इंदापूर अर्बन बॅंकेची निवडणूक बिनविरोध

इंदापूर अर्बन बँकेसाठी यंदा निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, याकडे तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या होत्या.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Indapur News : इंदापूर अर्बन बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत १७ जागांसाठी पाटील यांच्या पॅनेलचेच १७ अर्ज दाखल झाले आहेत, त्यामुळे बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली असून त्याची औपचारिक घोषणा होण बाकी आहे. स्थापनेपासूनच पाटील यांनी बॅंकेवर वर्चस्व कायम राखले आहे. (Indapur Urban Bank Election Uncontested: Harshvardhan Patil's Dominance Continues)

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे अर्ज दाखल झाल्याने बँकेवर त्यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. स्थापनेपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकहाती वर्चस्व राहिलेल्या इंदापूर (Indapur) अर्बन बँकेसाठी यंदा निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, याकडे तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या होत्या. त्यानुसार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाखेर संचालक मंडळाच्या संख्येएवढेच अर्ज दाखल झाल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध झाले असून फक्त याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

Harshvardhan Patil
Shahaji Patil News : ...तर मी विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार नाही; शहाजी पाटलांनी कोणाला दिले आव्हान

इंदापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसंदर्भात शहरामध्ये जोरदार चर्चा रंगत होती. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या बळावर बँकेवर पुन्हा वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे.

Harshvardhan Patil
Chitra Wagh Vs Jitendra Awhad : चित्रा वाघ-जितेंद्र आव्हाड ट्विटरवर भिडले; ‘एंटी चेंबर’ ते ‘कुलू मनाली’ सगळंच चव्हाट्यावर आलं

इंदापूर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी संदीप रमाकांत गुळवे (निमगाव केतकी), मच्छिंद्र मारुती शेटे-पाटील (इंदापूर), सुभाष लक्ष्मण बोंगाणे (पडस्थळ), मनोज विक्रम मोरे (माळवाडी नं.2), स्वप्निल बाळासाहेब सावंत (हिंगणगाव), संजय महादेव जगताप (डाळज नं.2), लालासाहेब आबासाहेब सपकळ (तावशी), विकास शिवाजीराव देवकर (लोणी देवकर), गोविंद दिगंबर रणवरे (निमसाखर), डॉ.मिलिंद किसनराव खाडे (इंदापूर), सत्यशील भिकाजीराव पाटील (वालचंदनगर), संजय बाबुलाल रायसोनी (भिगवण).

Harshvardhan Patil
Katraj Dairy : पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आठ संचालकांची अजितदादांकडे फिल्डिंग; 'त्या' संचालकांमुळे पवारांचीही कसोटी

अनुसूचित जाती जमाती अविनाश दामोदर कोथमीरे (इंदापूर), महिला प्रतिनिधी डॉ.अश्विनी अभिजीत ठोंबरे (इंदापूर), डॉ.दिपाली शिवाजीराव खबाले ( इंदापूर), इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी देवराज कोंडीबा जाधव (निमगाव केतकी), भटक्या व भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी भागवत मनोहर पिसे (इंदापूर) यांचेच अर्ज दाखल झाले आहेत.यामुळे त्यांच्या निवडीची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com