Congress News Sarkarnama
मुंबई

Congress Maharashtra : महाविकास आघाडीत काय चाललंय? काँग्रेस नेत्यांची मुंबईत सिक्रेट मिटिंग!

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव-

Maharashtra Congress Meeting Mumbai :

आगामी 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढाई होणार आहे. पण त्याआधी काँग्रेस नेत्यांची मुंबईत एक गुप्त बैठक पार पडली आहे.

काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने एक बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला या बैठकीच मार्गदर्शन करणार आहेत. मात्र या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची एक गुप्त बैठक मुंबईच्या गरवारे क्लब मध्ये बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसची पुढची रणनीती काय असणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला किती जागांची मागणी करायची आहे, या सगळ्याची रणनीती अखण्यासाठी ही बैठक पार पडली.

ही बैठक झाल्यानंतर टिळक भवन येथेही नेत्यांसोबत एक बैठक होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांची न्याय यात्रा येत्या काही दिवसांपासून सुरू होणार आहे. या यात्रेचा शेवट मुंबईत होणार आहे. त्यासाठी मुंबईत कशाप्रकारे तयारी केली जाऊ शकते आणि इतरही राजकीय गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे.

राहुल गांधी करणार न्याय यात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भरत जोडो यात्रा केली. याच यात्रेच्या पार्शवभूमीवर आता ते पुन्हा एकदा न्याय यात्रा करणार आहेत. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 20 मार्चपर्यंत चालेल. मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे. 65 दिवसांच्या या यात्रेत राहुल गांधी 6,200 किलोमीटर एवढे अंतर कापतील. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे.

यावेळी राहुल गांधी मणिपूर, मेघालय, नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपपासून देशाला न्याय मिळावा आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवण्यासाठी ही यात्रा काढली जाणार आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त तेलंगणामध्येच विजय मिळवता आला. उर्वरित चार राज्यांमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार होते. पण दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा दौराही केला होता. पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आले नाही. त्यामुळे या यात्रेमुळे इतर निवडणुकांमध्ये फायदा होईल, असा काँग्रेसला विश्वास आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT