Congress leaders during internal discussions as political strategies evolve in Mumbai ahead of the BMC elections amid the Thackeray brothers’ alliance. Sarkarnama
मुंबई

Congress BMC election : आघाडी तुटूनही काँग्रेस निभावणार छुपी मैत्री? मुंबईत ठाकरेंना फायदा होण्यासाठी व्यूहरचना

Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणूक रंगात आली असून, भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस स्वबळावर लढत अप्रत्यक्ष सहकार्याची भूमिका घेत असल्याचे संकेत आहेत.

विनोद राऊत

Mumbai Congress : महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची बुधवारी (ता. 24) अधिकृत घोषणा होणार झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे प्रचार सभांनाही मोठी रंगत येणार आहे. त्यातच भाजप या वेळी ‘हैदराबाद पॅटर्न’नुसार पक्षाचे सर्व स्टार प्रचारक मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, प्रचाराच्या धामधुमीपासून काँग्रेस नेतृत्व मात्र अलिप्त राहणार असल्याचे कळते. मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढत असली, तरी अप्रत्यक्ष आघाडी धर्म पाळण्याची स्थानिक निवडणुकांमध्ये केंद्रीय नेत्यांना उतरवण्याची आमची परंपरा नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना प्रचारात उतरवण्याची आवश्यकता नाही. राज्यातील नेते सक्षम आहेत. असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी, रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना मैदानात उतरविल्यास ठाकरे बंधूंवरील लक्ष हटू शकते. शिवाय आक्रमक प्रचार केल्यास मतांमध्ये फूट पडून भाजपचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे भाजपला (BJP) मदत होईल असे पाऊल उचलायचे नाही, याची खबरदारी काँग्रेस घेत आहे.

स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तेलंगणचे मंत्री मंत्री मोहम्मद अझरुद्दीन काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात येणार आहेत. राज्यातील 29 महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, शाहू छत्रपती महाराज, सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुकुल वासनीक, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट आदींचा समावेश आहे.

काँग्रेसकडून छाननी समिती जाहीर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने छाननी समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये अनुभवी नेत्यांसह मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्य करणार असून, मुंबईतील 227 जागांवर सक्षम उमेदवार देण्याची जबाबदारी या समितीवर असेल. चेन्निथला यांच्यासह खासदार वर्षा गायकवाड, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आदी या समितीचे सदस्य आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT