Congress Nana Patole Sarkarnama
मुंबई

MNS BJP Congress politics : हिंदीसक्ती वादामागे नानांना वाटतेय राज-फडणवीसांची 'मिलीभगत'

Nana Patole Alleges Fadnavis MNS Collusion in Hindi Imposition Controversy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा सरकारने आदेश कसा आला.

Pradeep Pendhare

Mahayuti Hindi politics : काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांना हिंदीसक्ती वादामागे वेगळाच संशय आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मिलीभगत असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा जाणीवपूर्वक उकरून काढण्यात आल्याचा दावा नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले म्हणाले, 'राज्यात सध्या अनेक ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी हिंदी भाषेचा वाद उकरून काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा सरकारने आदेश कसा आला, यामागे एक षड्‍यंत्र असून यामागे फडणवीस व राज ठाकरे यांची मिलीभगत आहे'.

‘अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी (Farmers) कर्जमाफीची मागणी सर्व बाजूंनी केली जात आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची मागणीही होत आहे. बेरोजगारी व महागाई प्रचंड आहे. जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोष आहे आणि सरकारकडे पैसेही नाहीत. त्यावर उत्तरही देता येत नाही. यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आला आहे, आल्याचा संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला.

या मुद्यामागे महायुती सरकारचे राजकारण असून फडणवीस-राज ठाकरे या दोघांनाही विद्यार्थी शिक्षण व भाषा याबद्दल काहीही देणेघेणे नाही. मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका कधीही होऊ शकतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चव्हाट्यावर आणला आहे. या दोघांनाही यातून राजकीय पोळी भाजायची आहे, असा घणाघात देखील नाना पटोले यांनी केला.

वादग्रस्त जीआर कसा निघाला?

‘मराठी भाषेची संस्कृती जपलीच पाहिजे. पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदीचे ओझे नसावेच, याबाबत दुमत नाही; पण हिंदी भाषेचा वाद हा शैक्षणिक मुद्दा न करता त्याला राजकीय स्वरूप देण्यात आले आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी पहिलीपासून हिंदी अनिवार्य करणार नाही, असे सांगितले; पण मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेताच वादग्रस्त जीआर कसा निघाला, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतविभाजन करून त्याचा फायदा भाजप व मनसेला व्हावा, हा यामागे हेतू असून मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असा प्रकार आहे,’ असेही नाना पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT