Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar : महाराष्ट्राच्या सीमावादाला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार : आंबेडकरांचा गंभीर आरोप!

सरकारनामा ब्यूरो

Prakash Ambedkar : एकीकडे महापुरूषांचा अवमान, सीमावाद हा प्रश्न घेऊन महाविकास आघाडीने मुंबईत महाविराट मोर्चा काढला आहे. भाजप विरोधात विरोधक एकवटले असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सीमावादासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यामुळे मागील काही काळापासून महाविकास आघाडीत वंचितचा सहभाग होण्याच्या शक्यतेवर पुन्हा प्रश्नचिन्हं उभे राहिले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "राज्यपालांनी वादग्रस्त विधान करायला नको होतं.त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये रोष आहे." यावेळी सीमावाद प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,सीमावादाच्या प्रश्नासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जबाबदार आहेत. जी गावं महाराष्ट्रात आहेत, ती गावे म्हणतायेत की, आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ द्या. यामुळे यासाठी हे दोन पक्ष जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील गावं इतर राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त करतायेत, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोषी आहेत, असा आरोप आंबेडकरांनी केला.

आंबेडकर पुढे म्हणाले, "शिवसेना हे जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर जाणार नाही, तोपर्यंत सीमावादाच्या प्रश्नाचा दोष त्यांच्यापासूनही दूर जाणार नाही. अविकसित राहिलेलीगावे आता शिवसेनेलाही अडचणीचे ठरणार आहे. शिवसेनेने राजकीय समझोता आणि आंदोलन दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या तर, याचे शिंतोडे त्यांच्यावर उडणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे राजकीय सूत जुळताना दिसत होते, मात्र आता या भूमिकेनंतर वंचित आणि ठाकरेंच्या मैत्रीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT