Mahavikas aghadi maha morcha : महामोर्चात न येण्याचं अशोक चव्हाणांनी दिले 'हे' कारण...

Mahavikas aghadi maha morcha : महाविकासआघाडीतील सर्वत पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
Mahavikas aghadi maha morcha :
Mahavikas aghadi maha morcha : Sarkarnama
Published on
Updated on

Mahavikas aghadi maha morcha : महापुरूषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरूवात झाली मोर्चात महाविकासआघाडीतील सर्वत पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षानेही या मोर्चात मोठी ताकद लावली आहे.मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे महत्त्वाचे प्रमुख नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) या मोर्चात सहभागी होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे आपण मोर्चात जरी सहभागी नसलो तरी आपली मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे.परंतु माजी आमदार अमिता चव्हाण या मोर्चात सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी मोर्चात सहभागी न होण्याचं कारण ही स्पष्ट केले आहे. एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

Mahavikas aghadi maha morcha :
Rupali Patil Thombare : मोर्चाला जाण्यापूर्वी रूपाली पाटील ठोंबरे यांची राज ठाकरेंवर टीका, म्हणाल्या...

चव्हाण ट्वीट करत म्हणाले, महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील.कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी.

आता चव्हाण यांनी लग्नाचं कारण दिले असले तरी, त्यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे. चव्हाणांनी मोर्च्याच्या दिवशी ऐनवेळी ही माहितीदिल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com