Atul Londhe  Sarkarnama
मुंबई

Old Pension Scheme : काँग्रेसने भाजपला घेरलं; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक होती तर...

Old Pension Scheme : ''जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?''

सरकारनामा ब्यूरो

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून केली आहे. यासाठी मागील हिवाळी अधिवेशनादरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा ही काढला होता.

यानंतर जुनी पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली. आता उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी "जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत आम्ही नकारात्मक नाही, असं भाष्य केलं आहे.

देवेंद्रे फडणवीस यांच्या या विधानावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हल्लाबोल केला आहे. ''जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र, योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची 'धमक' फक्त आपल्यातच आहे'', अशी फुशारकी ते मारत आहेत, असं हल्लाबोल त्यांनी केला आहे.

लोंढे म्हणाले, ''विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधान केले असले तरी फडणवीस यांच्या कपटनितीची शिक्षकांनाही कल्पना आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची 'धमक' आहे तर मग पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?'' असा सवाल अतुल लोंढे यांनी केला आहे.

''केंद्रातील अटबलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनेच २००३ साली जुनी पेन्शन योजना बंद करुन नॅशनल पेन्शन योजना (NPS) लागू केली असताना देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत त्याचे खापर काँग्रेस (Congress) सरकारवर फोडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आरएसएसच्या शिकवणुकीनुसार धादांत खोटे बोलण्यात पटाईत असतात. त्याप्रमाणे फडणवीसांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे खापर काँग्रेसवर फोडले, असं लोंढे म्हणाले.

''नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे सरकारला शक्य नाही, असे स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी सांगितले होते. मग आताच फडणवीस यांच्यात धमक कुठून आली? नागपूरच्या अधिवेशनात किंवा मागील ५ वर्षे मुख्यमंत्री असताना ही धमक कोठे गेली होती?

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा केवळ पाठिंबाच नसून काँग्रेसशासित राज्ये राजस्थान, छत्तिसगड, व हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना लागूही केली आहे. ही राज्ये जुनी पेन्शन योजना राबवू शकतात तर मग महाराष्ट्र हे तर प्रगत राज्य आहे, असं ते म्हणाले.

''ही योजना लागू केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडेल हे फडणवीसांचे म्हणणे चुकीचे वाटते. सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव व काँग्रेसशासित राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा विचार बदललेला दिसतो. पण काहीही झाले तरी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे'', असे लोंढे यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT