Marathwada Teacher Constituency : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार फटकेबाजी करत धमाल उडवली. भाजप युतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील (Kiran Patil) यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जोरदार भाषण करत उपस्थितांना खूष केले.
शिक्षकांचे शंभर टक्के प्रश्न सोडवायचे असतील तर किरण पाटलांना देखील शंभर टक्के मतदान झाले पाहिजे, असे आवाहन करतांनाच केवळ शिक्षक मतदारसंघातच नाही, तर यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, विधानसभा अशा सगळ्याच निवडणुकीत आपण खारीचा वाटा उचलू, असा विश्वास देत सत्तारांनी (Abdul Sattar) फडणवीसांना (Devendra Fadanvis) देखील खूष करून टाकले. किरण पाटील यांच्या प्रचारासाठी शहरातील संत एकनाथ रंग मंदिरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले, शेतीमध्ये आपण जसे पीक घेतांना प्रयोग करतो, जुन्या बियाणांऐवजी संक्रीत बियाणे वापरून पाहतो तेव्हाच आपल्याला फरक जाणवतो. तसं शिक्षक मतदारसंघातही आता प्रयोग करून पहा, किरण पाटील हे संक्रीत बियाणे आहे, तेव्हा जुन्याऐवजी नव्या बियाणाचा वापर करा, निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला.
आणखीही काही शिक्षकांच्या त्यात समावेश करायचा आहे, तो देखील होईल. आचारसंहिता असल्याने अधिक बोलता येणार नाही, पण शंभर टक्के प्रश्न सोडवायचे असतील, तर किरण पाटील यांना मतदान देखील शंभर टक्के झाले पाहिजे. बाळासाहेबांची शिवसेना या आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत आघाडीवर असणार आहे.
मी देखील त्यात खारीचा वाटा उचलणार आहे. राज्याची तिजोरी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हातात आहे, त्यामुळे त्यांचा जयघोष एवढ्या मोठ्याने करा की, मुंबईची तिजोरी हलली पाहिजे, अशी मिश्किल टप्पणी देखील सत्तार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.