Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : दिल्लीतील तमाशा 'लांछनास्पद', भाजप स्वतःवरील संकटांची सावरसावरी करतोय; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Slams Election Commission & BJP Over Rahul Gandhi Vote Theft Allegation in Mumbai : इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावरील मोर्चानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली.

Pradeep Pendhare

Mumbai press conference : मत चोरीच्या मुद्यावरून इंडिया आघाडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी रोखलं. खासदारांना निवडणूक आयुक्तांना भेटायला घेऊन जातो, असे सांगून पोलिस ठाण्यात नेलं.

मत चोरीवरून निवडणूक आयोगाबरोबर संघर्ष सुरू असताना, भाजप सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप म्हणजे, भाजप स्वतःवरील संकट सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाच्या दिल्लीतील राजनाधीत झालेला तमाशा भाजप सत्ताधाऱ्यांसाठी लांछनास्पद असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

दिल्लीत इंडिया आघाडीच्या मोर्चानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, राहुल गांधी मत चोरीचा प्रकार सहप्रमाण सिद्ध केलेल्या समर्थन करत भाजप एनडीए आघाडीवर जोरदार प्रहार केला. भाजपवर स्वतः संकट आलं आहे, त्यामुळे मत चोरी कशी लपवता येईल, यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "दिल्लीत निवडणूक आयोगावर (Election Commission) इंडिया आघाडीचे खासदार, नेते मोर्चा घेऊन जात असताना, त्यांना पोलिसांनी पकडून अटक केली. ही निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांची ही कारवाई म्हणजे, सरकारने केलेली ही कृती म्हणजे, बट्टा लागला आहे. ही लढाई निवडणूक आयोगाविरुद्ध आहे. परंतु यात सरकार आणि भाजप का पडतं आहे, हे आता उघड झालं आहे".

उरफाटा कारभार

'काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी कशी झाली हे सहप्रमाण दाखवून दिली. त्याची त्यांनी उघड पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्ष नेते म्हणून शपथ पूर्वक करून देखील निवडणूक आयोग त्यांच्याकडेच शपथपत्र मागत आहे. हा कोणता उरफाटा कारभार आहे', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.

'सर्वोच्च'पेक्षा आयोग मोठा झाला

'बिहारमध्ये देखील लाखो मतदारांची नावं वगळली आहे. याला 'एसआयआर' म्हटलं आहे. उलट निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाला सांगत आहे की, ही नाव तुम्हाला देणं बंधनकारक नाही. यावर प्रश्न उपस्थित होतो की, सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त मोठे आहे की काय?', असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

निवडणूक आयुक्त 'सर्वोच्च' झाले

'आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयापेक्षा सर्वोच्च अधिकार राष्ट्रपतींना आहे. मग निवडणूक आयोग किंवा आयुक्त राष्ट्रपतीपेंक्षा मोठे आहेत का? किंवा सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्यापेक्षा निवडणूक आयुक्तांना मोठे अधिकार आहेत का? निवडणूक आयोग बांधिल नाही, असे म्हणत असेल, तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. लोकशाहीची लढाई पेचून टाकता आहात', असा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला.

'मत चोरी' भाजपवरील संकट

'संपूर्ण जगानं पाहिलं की, हिंदुस्थानमधील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या दिवसाढवळ्या होते आहे. जागतिक परिस्थिती पाहिल्यास, अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प ज्या काही धमक्या देत आहेत, हे देशावरचं संकट आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सर्व विरोधी पक्ष देशासाठी एकदिलाने पंतप्रधानांसोबत उभे राहिलो, तसं आता सुद्धा पंतप्रधानांनी उभे राहिलो असतो. पंतप्रधानांनी देखील अशा परिस्थिती आपण देशासाठी काय करू शकतो, हे विचारण्याची अपेक्षा होती. तसं न करता, अमेरिकेचे संकट, देशावरचं संकट नंतर बघू, पण अगोदर भाजपवर आलेले संकट, मत चोरी कशी लपवता येईल, अन् ती लपवण्यासाठी आटापिटा सुरू आहे, असे दिसतं आहे', असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT