Dombivli: राम मंदिर उद्घाटन समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आले नाही, त्या आदिवासी असल्याने त्यांना आमंत्रण देण्यात आले नाही का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला केले आहे.
काँग्रेसच्या कोकण विभागाची जिल्हानिहाय आढावा बैठक भिवंडी येथे झाली. यावेळी चेन्नीथला पत्रकारपरिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसने अशा बैठकीचे आयोजन केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. देशातील बेरोजगारी , वस्तूंच्या वाढत्या किमती यावर नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. ते केवळ आणि केवळ राम मंदिर या विषयावरच बोलतात, असे वक्तव्य त्यांनी केले.
आम्ही सगळेच रामभक्त आहोत. पण भाजपकडून निवडणुकीसाठी रामाच्या नावाचा वापर केला जात आहे. चारही शंकराचार्य यांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला विरोध असतानाही मोदींनी कुणाचेही ऐकले नाही. देशात सर्वधर्मसमभाव अशी परंपरा आहे. मात्र मोदी हीच परंपरा मोडीत काढत आहेत, असे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर रामापेक्षा या सोहळ्यात मोदींना महत्त्व मिळाले, अशी शेलकी टीका त्यांनी केली.
आसामचे मुख्यमंत्री स्वतः चोर आहेत...
राहुल गांधी आसाम यात्रा करण्यासाठी गेले असताना त्यांना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी अडवले. मात्र लोकांनी त्यांचे मोठ्या मनाने स्वागत केले. त्यावेळी राहुल गांधी यांना आसामचे मुख्यमंत्री चोर म्हणाले, पण ते स्वतःच एक मोठे चोर आहेत," असा आरोप त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीबाबत आमच्या बैठका सुरू असून या आठवड्यात आमच्या सगळ्या जागा नक्की होतील, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आम्ही निषेध करतो. हे सरकार सगळ्यांवर कारवाई करीत आहे. मात्र भाजपच्या एकाही नेत्यांवर आतापर्यंत कारवाई झाली नाही, याचे वाईट वाटते. सगळ्यांना दबावाखाली आणून यांना विरोधी पक्ष नष्ट करायचे आहेत, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
Edited by: Mangesh Mahale
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.