Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Prakash Ambedkar: 'निजामी मराठ्यांपासून' जरांगेंनी सावध राहावे, ते घात करतील!

Manoj Jarange News : आंदोलनामुळे सरकार जेरीस
Published on

Dharashiva News: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही समाजात मध्यस्थी करण्यास पुढाकार घेतला आहे. मराठा, ओबीसी समाजात जो वाद सुरू आहे, त्यामध्ये मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचा आंदोलन आहे. आंदोलनामुळे सरकार जेरीस आले आहे. जरांगेंनी लोकसभा निवडणुकीपर्यंत 'निजामी मराठ्यांपासून' सावध राहायला हवं, ते घात करतील," अशी भीती आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. "मनोज जरांगे हे ज्या आंदोलनात चालतात, त्या आंदोलनात त्यांनी मोजकी लोक सोडून सामान्य लोकामध्ये जेवण केले पाहिजे, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना दिला.

Prakash Ambedkar
Congress Meeting: पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून रिंगणात...; काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारी...

"भारतात धर्माचा प्रचार-प्रसार करायला पाहिजे, पण त्याअगोदर आपण कुठल्या पदावर आहोत, हे पाहायला हवे. रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती, पण आपले पंतप्रधानपद जाईल, या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली," अशी टीका आंबेडकरांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित आहेत. यावर आंबेडकर म्हणाले, "आपण काही केले नसेल तर घाबरू नका, आपली संपत्ती जाहीर करा," आंबेडकर धाराशिव येथे पत्रकारांशी बोलत होते. जरांगेंनी गरीब मराठा असा वेगळा गट तयार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com