BJP-Congress Politics: Sarkarnama
मुंबई

BJP-Congress Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; राज्यभर 'शर्म करो मोदी' आंदोलन

पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Nana Patole News update : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत मोठा खुलासा केला. केंद्रातील मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला आहे. मलिक यांच्या या खुलाशानंतर काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Congress will hold a state-wide 'Shame Karo Modi' protest tomorrow against PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोमवारी (१७ एप्रिल) काँग्रेस रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक जवान मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मौन बाळगण्यास सांगितले, असा दावा मलिक यांनी केला. पण या घटनेमादे मोठे षडयंत्र होते. हे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते, असे नाना पटोलेय यांनी म्हटलं आहे. (Congress)

तसेच, सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगले, असे अनेक सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, बॅनरखाली उद्या सोमवारी १७ एप्रिल रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची नाना पटोले यांनी दिली आहे.

वाचा, काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सत्यपाल मलिक यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.सीआरपीएफचा ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही. विमान दिले असते तर हा हल्ला झालाच नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच आपण पंतप्रधान मोदींना आपल्यामुळे जवानांचे प्राण गमावले, असे म्हटलं. पण यावर पंतप्रधानांनी आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. असही मलिक यांनी यावेळी सांगितल.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT