Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge Sarkarnama
मुंबई

Mallikarjun Kharge: " पंतप्रधान मोदींचं 'ते' चालतं, मग राहुल गांधींनाच विरोध का..?"; खर्गेंचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

Mallikarjun Kharge Vs Bjp: काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेला मिळणार्या प्रतिसादात दिवसेंदिवस वाढच होत आहे. याचवेळी कोरोनाचे कारण देत केंद्र सरकारने जर कोरानाचे नियमांचे पालन केले नाहीतर भारत जोडो यात्रा थांबविण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्यालाच आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाचा १३८ व्या स्थापनादिन साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खर्गे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली.

खर्गे म्हणाले, भाजपाने देशात निर्माण केलेल्या द्वेषाच्या वातावरणाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न म्हणजे भारत जोडो यात्रा आहे. मात्र, या यात्रेमुळे मोदी सरकार घाबरलं आहे. म्हणूनच कोविडचं कारण पुढे करत राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली होती. कोरोनामुळे भारत जोडो यात्रेसारखे कार्यक्रम होऊ देऊ नका. पण याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदींनी तसं केलं तर चालतं, आणि राहुल गांधींच्या भारत जोडोला मात्र विरोध करायचा असा हल्लाबोल खर्गे यांनी भाजपावर केला.

'' भाजपाकडे खूप मोठे वॉशिंग मशीन..''

खर्गे पुढे म्हणाले, केंद्रातील सरकार हे खोटं बोलणारं सरकार आहे. या सरकारकडून देशाच्या मूळ भावना आणि तत्त्वांवर सातत्यानं आघात केले जात आहेत. देशभरात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. मात्र सरकार या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत लढा द्यायला हवा.

तसेच भाजपाकडं खूप मोठं वॉशिंग मशीन आहे. ते मोठं डागही साफ करू शकतं. लोकांना या मशीनमध्ये टाकल्यावर ते स्वच्छ होऊन बाहेर येतात असा टोलाही खर्गे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT