Jacqueline Fernandez and Nora Fatehi 

 

Sarkarnama

मुंबई

जॅकलिन अन् नोरानंतर आता आणखी बड्या अभिनेत्री रडारवर

दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपीकडून कोट्यवधी रुपयांची गिफ्ट स्वीकारणाऱ्या दोन अभिनेत्री आता जाळ्यात अडकल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपीकडून कोट्यवधी रुपयांची गिफ्ट स्वीकारणाऱ्या दोन अभिनेत्री आता सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) जाळ्यात अडकल्या आहेत. जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) या त्या दोन अभिनेत्री आहेत. आता या प्रकरणात आणखी काही अभिनेत्रींची नावे समोर आली असून, ईडीने त्यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला आहे.

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) असे या आरोपीचे नाव आहे. तब्बल दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार आहे. आता याच सुकेशने जॅकलिनला भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर भेट दिल्याचे समोर आले आहे. याचबरोबर त्याने मिनीकूपर कार आणि अनेकवेळा जॅकलिनला महागडे दागिने भेट दिले होते. त्याच्याकडून तिने दीड लाख डॉलरचे कर्जही घेतले होते. अभिनेत्री नोरा फतेही हिला सुकेशकडून एक बीएमडब्लू कार, गुस्सी बॅग, आयफोन दिला होता. सुकेश याच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, त्यात ही माहिती उघड झाली आहे. आता दोघींचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.

जॅकलिन आणि नोरासोबत बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या. सुकेशची सहकारी पिंकी इराणी आता ईडीला सापडली आहे. तिने या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे अनेक अभिनेत्रींसोबत सुकेशची उठबस असल्याचे समोर येत आहे. जॅकलिन आणि नोरा प्रमाणे इतर अभिनेत्रींना सुकेशकडून गिफ्ट मिळाली होती. याचबरोबर त्यांचे सुकेशसोबत आर्थिक व्यवहारही होते. त्यामुळे त्यांना लवकरच चौकशीसाठी ईडी बोलावणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जॅकलिन आणि नोरा या प्रकरणात नुकत्याच ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. सलग चार वेळा चौकशीला हजर होणे टाळल्यानंतर अखेर जॅकलिन ईडीच्या दिल्ली कार्यालयात हजर झाली होती. कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यातंर्गत जॅकलिनचा जबाब त्यावेळी नोंदवण्यात आला होता. जॅकलिन आणि नोराचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत त्यांची ओळख यामुळे त्या ईडीच्या रडारवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT