भाजपच्या खासदाराने स्टेजवरच मल्लाच्या कानाखाली लगावली अन्..

भाजपच्या (BJP) खासदाराने (MP) भर कार्यक्रमात स्टेजवरच युवा मल्लाच्या (Wrestler) कानाखाली दोन वेळा लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
BJP MP Brij Bhushan Sharan 

BJP MP Brij Bhushan Sharan 

Sarkarnama

Published on
Updated on

रांची : भाजपच्या (BJP) खासदाराने (MP) भर कार्यक्रमात स्टेजवरच युवा मल्लाच्या (Wrestler) कानाखाली दोन वेळा लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे कानाखाली लगावणारे खासदार ब्रिजभूषण शरण (Brij Bhushan Sharan) हे भारतीय कुस्ती संघटनेते अध्यक्ष आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

झारखंडची राजधानीमध्ये ही घटना घडली आहे. ब्रिजभूषण शरण हे उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील खासदार आहेत. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (15 वर्षांखालील गट) रांचीत सुरू आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून शरण उपस्थित होते. हा कार्यक्रम शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियममध्ये झाला. याचवेळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे स्पर्धेला आयोजनाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

<div class="paragraphs"><p>BJP MP Brij Bhushan Sharan&nbsp;</p></div>
आता ईडी अन् सीबीआयची वाट बघतोय! अखिलेश यांचं भाजपला खुलं आव्हान

कार्यक्रमात स्टेजवर युवा मल्ल मुलगा आला. त्याने स्पर्धेत खेळण्याची परवानगी शरण यांच्याकडे मागितली. परंतु, त्याचे वय जास्त असल्याचे कारण देत त्याला खेळण्यास नकार देण्यात आला. तरीही तो वारंवार विनवणी करू लागला. यामुळे खासदार शरण यांचा पारा चढला. त्यांनी अखेर त्या मल्लाचा कानाखाली लगावली. यामुळे स्टेजवरील सर्वांनाच धक्का बसला. युवा मल्लाच्या अंगावर जाणाऱ्या खासदारांना अखेर स्टेजवरील काही जणांनी आवरले. अखेर त्या मल्लाला स्टेजवरून खाली पाठवण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com