Ramesh Mhatre Bail  Sarkarnama
मुंबई

Ramesh Mhatre : कोर्टाच्या दणक्यानंतर मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिस ठाण्यात हजर, जामीनही रद्द!

Ramesh Mhatre Court Police : न्यायलायने नरेश म्हात्रेंच्या जामीनाला स्थगिती दिली होती. आज म्हात्रे हे पोलिस ठाण्यात हजर झाले.

Roshan More

Ramesh Mhatre News : डोंबिवलीमधील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण प्रथम दंडाधिकारी न्यायालयाने जामीन दिला होता. त्यामुळे म्हात्रे हा तुरुंगाबाहेर आला होता. मात्र, या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत कठोर ताशेरे ओढले. तसेच म्हात्रे यांना शरण येण्याचे निर्देश दिले होते.

शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील न्यायलायने कामकाज करत म्हात्रेंच्या जामीनाला स्थगिती दिली होती. त्यात आज म्हात्रे हे पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे या तिघांनाही १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, नंतर त्यांनी जामीनासाठी अपिल केला होता. तेव्हा म्हात्रे यांना जामीन मंजुर करण्यात आला होता.

शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवरील कथित मारहाणीच्या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती.

न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलिसांना आरोपींची चौकशी, घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT