Ambarnath deputy mayor public meeting video viral Sarkarnama
मुंबई

Viral Video: "भ्रष्टाचार अन् चोरी ही व्हायलाच पाहिजे..." भर सभेत उपनगराध्यक्षांचं अजब वक्तव्य, सदस्यांना हसून आवरेना; व्हिडिओ तुफान व्हायरल

Thane Ambarnath News : राजकारणातील भ्रष्टाचार हा जनतेसाठी आता नवीन राहिलेला नाही. पण या भ्रष्टाचाराचं जेव्हा हेच राजकारणी उघडपणे समर्थन करतात तेव्हा मात्र जनतेनं त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं ठरतं.

Amit Ujagare

Thane Ambarnath News : राजकारणातील भ्रष्टाचार हा जनतेसाठी आता नवीन राहिलेला नाही. पण या भ्रष्टाचाराचं जेव्हा हेच राजकारणी उघडपणे समर्थन करतात तेव्हा मात्र जनतेनं त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं ठरतं. अशाच भ्रष्टाचाराचं उघडपणे भाष्य करण्याचं भानही ठाण्यातील अंबरनाथच्या उपनगराध्याक्षांना राहिलेलं नाही. नगरपरिषदेच्या मुख्यसभेमध्ये उपनगराध्यक्षांच्या खुर्चित बसून सदाशीव पाटील हे विधान केल्यानं सध्या चर्चेत आहेत. याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत नेमकं काय?

अंबरनाथ नगरपरिषदेची सभा सुरु असताना एका नगरसेवकानं प्रशासनातील भ्रष्टाचारावर भाष्य करणारं भाषण केलं. त्यांनी म्हटलं की, "जोपर्यंत मी एखादी गोष्ट सिद्ध करु शकत नाही तोपर्यंत मी त्याला भ्रष्टाचार म्हणूच शकत नाही. याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे, याबाबत कोणीतरी पत्र व्यवहार करतं पण नुसतं त्यावर आपण काय करणार मॅडम?" असा सवाल या नगरसेवकानं नगराध्यक्षांना विचारला.

यानंतर या नगरसेवकांना मध्येच थांबवत मुख्यनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलं. त्यांनी म्हटलं की, "भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात व्हायला पाहिजे पण ती अति व्हायला नको. भ्रष्टाचार असलाच पाहिजे पण त्याचं पर्संटेज अगदी कमी असायला हवं. यावेळी त्यांच्या बाजुला बसलेल्या नगराध्यक्षांनी त्यांना टोकलं आणि सांगितलं की तुम्ही काय बोलत आहात? तेव्हा आणखीनच त्वेषानं बोलायला लागले. पत्रकारांना देखील या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की नाही?" असा उलट सवाल ते विचारत राहिले. त्यांचं हे सुरु असताना इतर सदस्यांनी मात्र डोक्यालाच हात लावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, भर सभागृहात अनेक नगरसेवक मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्या उपस्थितीत या उपनगराध्यक्षांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडिओ खाली जतनेनं देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकारणात भ्रष्टाचार आणि चोऱ्या खरोखरच होत असतात पण ते इतकं निर्लज्जपणे कसं काय सांगितलं जाऊ शकतं? या उपनगराध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांचं पद जायला पाहिजे, अशा कमेंट युजर्सनं केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT