Warkari IMP News: "आळंदीत न जाता पुण्यात थांबा" वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा सर्वात महत्वाचा संदेश; नेमकी परिस्थिती काय?

Alandi Wari update: पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हा पाऊस असाच पुढील काही दिवस कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Pandharpur Wari 2026
Pandharpur Wari 2026Sarkarnama
Published on
Updated on

CM appeal to Warkaris: पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हा पाऊस असाच पुढील काही दिवस कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत अपडेट दिली. यामध्ये त्यांनी आषाढी वारीसाठी पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा संदेश दिला आहे.

Pandharpur Wari 2026
Mumbai Heavy Rain: मुंबईसह राज्यात तुफान पाऊस, अधिवेशनालाही फटका! आमदार अडकून पडले; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याची शक्यता

वारकऱ्यांना महत्वाचं आवाहन

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, "वारी सुरु होत आहे. वारीच्या निमित्तानंही खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळं इंद्रायणी नदीवरील चारही पूल हे पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळं वारकऱ्यांनाही विनंती आहे की, आळंदी आणि देहूवरुन पालख्या १० तारखेला पुण्यात पोहोचतात. या पालख्या आपण पुण्यात आणूच पण वारकऱ्यांना आमची विनंती आहे की, त्यांनी आळंदी-देहूमध्ये न जाता थेट पुण्यातच आलं पाहिजे, कारण तिथं जाणं हे धोक्याचं आहे.

त्यामुळं वारकऱ्यांना विनंती आहे की, मोठ्या प्रमाणावर देहू-आळंदीला जमा न होता ते जर पुण्यात आले तर सोईचं होईल किंवा त्यामुळं कुठल्याही दुर्घटना घडणार नाहीत. बाकी वारीकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या सर्व शासनानं केल्या आहेत.

पण आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये यासाठी जी काही व्यवस्था करायची आहे ती राज्यशासनानं केली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Pandharpur Wari 2026
Agniveer: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! आता सैन्यात कायम स्वरुपाची नोकरी मिळणार; सरकारचा प्लॅन काय?

नागरिकांना आवाहन

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे अलर्ट आपण सातत्यानं देत आहोत. मंत्रालयातील कक्ष २४ तास काम करतो आहे, या विभागाचे सचिव आणि त्यांची टीम ही सातत्यानं सगळ्या जिल्ह्यांची आणि सगळ्या विभागांशी संपर्कात आहेत.

अगदी गाव पातळीवर आपल्याकडं अलर्ट येत आहेत. ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम या कक्षामार्फत होत आहे. त्याचबरोबर बीएमसीचा कक्षही त्याच पद्धतीनं काम करतो आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा.

जो कालावधी आम्ही सातत्यानं सांगतो आहोत, जो कालावाधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्यावेळेत लोकांनी रस्त्यावर येऊ नये. अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करुच नये, अशी सर्वांना विनंती आहे, असंही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

जुलैचा सरासरी पाऊस चार दिवसात

जीवितहानी काही प्रमाणात झालेली आहे. जुलैचा सरासरी पाऊस केवळ चार दिवसातच पडला आहे. उद्या नाशिकसाठीही हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिला आहे, इथं ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com