Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला (अंमलबजावणी संचलनालय) खडे बोल सुनावले आहे. आपल्या विरोधातील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी भुजबळांनी याचिका दाखल केली आहे. यासाठी ईडीने युक्तिवादासाठी पुन्हा तारीख वाढवून मागितली आहे. मात्र ईडीने तारीख वाढवून मागताच, विजय अग्रवाल यांनी ईडीच्या भूमिकेवरची आक्षेप घेतलाय. (Latest Marathi News)
याप्रकरणी जाणूनबुजून युक्तिवाद करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येताय, असा आरोप करण्यात येतोय. न्यायाधीश न्यायाधीस राहुल रोकडे यांनी सुद्धा ईडीवर ताशेरे ओढले. अखेर १ जुलैपर्य़ंत ईडीला शेवटची मुदत ईडीला देण्यात आलेली आहे. तर सत्र न्यायालयाने ईडीला खडे बोल सुनावले आले.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीलाच आता खडे बोल सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने हे खडे बोल ईडीला सुनावले असून, आता ईडीला शेवटची मुदत दिली आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका भुजबळांनी दाखल केलेली आहे. यावरच आता युक्तिवादासाठी पुन्हा तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. (Court gives harsh words to ED)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.