Sachin Waze Extortion Case : Sarkarnama
मुंबई

Sachin Vaze News : मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचा डाव सचिन वाझेचाच; जामीन फेटाळताना NIA ने नोंदवले निरीक्षण...

Mangesh Mahale

Mumbai : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करून त्यांच्या मनात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षण राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) न्यायालयात नोंदवलं आहे. वाझेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

सचिन वाझेंच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक खुलासे एनआयएने केले आहेत. अँटिलिया स्फोटकप्रकरणी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह 10 आरोपींविरोधात NIA ने आरोपपत्र दाखल केले आहे. मनसुख हिरेन यांची सुनियोजित हत्या करण्याचा डाव सचिन वाझे याचा होता, असे मत एनआयएने नोंदवले आहे.

एनआयए न्यायालयानं वाझेचा अर्ज फेटाळताना ताशेरे ओढले आहेत. विशेष एनआयए न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी दिलेला तपशीलवार आदेश शुक्रवारी न्यायालयाने उपलब्ध करून दिला आहे. न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आरोपी सचिन वाझेचा जामीन अर्ज 16 सप्टेंबरलाच फेटाळला होता. या प्रकरणात आता सविस्तर आदेश देण्यात आला आहे. या आदेशात कोर्टाचं निरीक्षण समोर आलं आहे.

वाझे याच्यावरील आरोप गंभीर असल्याचे आदेशात म्हटले आहे. अशा परिस्थितीत जर अर्जदाराची जामिनावर सुटका झाली, तर तो साक्षीदारांशी छेडछाड करण्याची शक्यता आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. वाझे हा मुंबई पोलिस दलातील बडतर्फ अधिकारी आहे. सध्या तो मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अंबानी यांच्या घरासमोर कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आल्याच्या प्रकरणात कारागृहात आहे.

दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी कृत्य करणं, दहशतवादी टोळीचा सदस्य असणं, मनसुख हिरेनचे अपहरण आणि खून करणे तसेच गुन्हेगारी कट रचणे आदी स्वरूपाचे गुन्हे सचिन वाझेने केले आहेत. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद एनआयएने केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT