JDS Join NDA : कर्नाटकात पराभूत झालेल्या BJPच्या रथाला JDSचे चाक; 'फॅमिली प्रायव्हेट पार्टी' म्हणून मोदींनी हिणवलेला पक्ष NDA मध्ये सहभागी

NDA Politics : कर्नाटकमध्ये भाजपला दिलासा मिळाला आहे.
JDS Join NDA
JDS Join NDA Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : कर्नाटक निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी जनता दल सेक्युलर पक्षाला (JDS) 'फॅमिली प्रायव्हेट पार्टी' म्हणून हिणवलं होतं तोच दक्षिणेतील सर्वात मोठा पक्ष जेडीएस आता भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाला आहे. कालपर्यंत एकमेकांवर तुटून पडणारे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देवेगौडा यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फायदा एनडीएला होईल, असा विश्वास भाजपला आहे. जेडीएस एनडीएमध्ये सामील झाल्याने तामीळनाडूमध्ये अण्णाद्रमुकसोबत युती तुटली असली तरी कर्नाटकमध्ये भाजपला दिलासा मिळाला आहे.

JDS Join NDA
Kavthemahankal Nagar Panchayat : राष्ट्रवादीचे टेन्शन वाढलं; कवठेमहांकाळमध्ये चार नगरसेवक भाजपच्या वाटेवर, रोहित पाटलांना धक्का...

शुक्रवारी जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जागावाटपाबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरने एनडीएत सामील होण्याची घोषणा केली.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोशल मीडियावर जेडीएसचे स्वागत केले आहे. "मला आनंद आहे की, जेडी (एस) ने रालोआ आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएमध्ये आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशामुळे एनडीए आणि पंतप्रधान मोदींच्या न्यू इंडिया, सशक्त भारताच्या व्हिजनला आणखी बळ मिळणार आहे," असे नड्डा यांनी टि्वट केले आहे.

"आम्ही भाजपशी हातमिळवणी करण्याबाबत औपचारिक चर्चा केली. आम्ही प्राथमिक मुद्द्यांवर औपचारिक चर्चा केली आहे. तसेच आमच्या काही मागण्या नाहीत," असे जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर माध्यमांना सांगितले. जेडीएसला कर्नाटकातील मंड्या, हसन, बंगळुरू (ग्रामीण) आणि चिकबल्लापूर या जागांवर निवडणूक लढवायची आहे. भाजपने जेडीएसला कोणत्या जागा देण्यास सहमती दर्शवली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

JDS Join NDA
Women Reservation Bill : महिला आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला डिवचलं; म्हणाले, "ओबीसींची एवढी बाजू घेता तर..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com