MangalParabhat lodha Sarkarnama
मुंबई

मंगलप्रभात लोढा, नार्वेकरांना कोर्टाने फटकारले : गुजरात निवडणूक अधिकृत काम आहे का?

Mangalprabhat Lodha : वकीलांकडून गुजरात निवडणुकीतील व्यस्ततेचं कारण दिले होते.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गुजरात निवडणुकीत सहभागी होणं हे अधिकृत काम आहे का? असा सवालच आता न्यायालयाने उपस्थित केला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) व भाजपचे नेते व राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा (MAngalPrabhatLodha) यांना मुंबई सत्र न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. न्यायाधीश रोकडे यांनी हे ताशेरे ओढले आहे.

२०२० मध्ये महाविकास आघाडी सरकार असताना, विरोधीपक्षात असणाऱ्या भाजप नेत्यांनी दक्षिण मुंबईत वीज बील दरवाढीवरून मोठे आंदोलन केले होते. बेस्टच्या व्यवस्थापकांना त्यांनी घेरण्याच्या प्रयत्न केला होता. या प्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाची सुनावणी कोर्टात पोहचली आहे. यामध्ये विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि इतरही काही नेत्यांचा समावेश आहे. यांच्यावर खटला चालू आहे. सातत्याने हे लोक गैरहजर असल्याने, न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

मागील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. तेव्हा गैरहजेरीचं कारण विचारलं असता, त्यांच्या वकीलांकडून गुजरात निवडणुकीतील व्यस्ततेचं कारण दिलं. यावेळी न्यायालयाने संतप्त होत म्हंटले आहे की, गुजरात निवडणुकीचं कामकाज कोणत्या अधिकृत कामकाजात मोडतं? गुजरात निवडणुक न्यायालयाच्या वेळापेक्षा महत्त्वपूर्ण आहे का? असे सवाल न्यायालयाने उपस्थित केले.

तूर्तास ही सुनावणी २१ डिसेंबरपर्यंत तहकूब करत पुढील सुनावणीत सर्व आरोपींना एकत्र उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT