Shahajibapu Patil : आसामच्या मुख्यमंत्र्यांसमोर बापू इंग्लिशमधून म्हणाले, 'काय झाडी, काय डोंगार..

Shahajibapu Patil : चक्कं इंग्रजीतही बोलून दाखवला. यावेळी सर्वजण अवाक झाले.
Shahajibapu patil
Shahajibapu patilSarkarnama
Published on
Updated on

Shahajibapu Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदार आधी गुजरातमधील सुरत, मग आसामच्या गुवाहाटीत गेले. येथील कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं. या दौऱ्यात सांगल्याचे आमदार आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के हा डायलॉग तूफान गाजला. महाराष्ट्रभर या डॉयलॉगने प्रसिद्धी पावली होती. बापूंच्या याच डॉयलॉगची थेट आसामच्या मु्ख्यमंत्र्यांच्या आता भुरळ पडली.

Shahajibapu patil
कामाख्या देवी पावली?,१२ माजी नगरसेवक शिंदे गटात

गुवाहाटीच्या दौऱ्यावर गेले असताना शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची भेट घेतली. तेव्हा मुख्यमंत्री शर्मा यांनी बापूंना त्यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के हा डॉयलॉग म्हणायला लावला. यावेळी बापूंनी शर्मा यांच्या विनंतीला माना देत, त्यांच्या काय झाडी हा डॉयलॉग मराठीत तर बोलून दाखवलं, मात्र त्यांनी हा डॉयलॉग चक्कं इंग्रजीतही बोलून दाखवला. यावेळी सर्वजण अवाक झाले.

Shahajibapu patil
Gujarat Elections 2022 : विद्यार्थिनींना स्कुटी, ज्येष्ठ महिलांना मोफत बस प्रवास ; भाजपचा जाहीरनामा

गुवाहाटी दौऱ्याला चार मंत्र्यासह सहाजण गैरहजर, शिंदे गटात नाराजी? चर्चांना उधाण

आताच्या गुवाहाटी दौऱ्याला चार मंत्री आणि दोन आमदारांनी दांडी चक्कं दांडी मारल्याने या दौऱ्याची चांगलीच चर्चा होती. शिंदे गटातील काही महत्त्वाच्या आमदारांनी दांडी मारल्यामुळे उलट सुटल चर्चांना उधान आले होते. आताच्या दौऱ्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभुराज देसाई गैरहजर राहिले आहेत. तर मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणेदेखील गुवाहाटीला गेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com