Meeting At Varsh
Meeting At Varsh Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Vs Vijay Shivtare : विजय शिवतारे - अजित पवारांचं वैर मिटलं; रात्रीच्या भेटीत काय ठरलं?

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत टोकाच्या भाषेचा वापर करत बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणारच, अशी घोषणाच माजी मंत्री विजय शिवतारेंनी केली होती. शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांत ठिणगी पडली होती. याचा परिणाम बारामतीसह ठाण्यातही भोगावा लागणार, हे लक्षात घेऊन बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अजित पवार आणि शिवतारेंची भेट घडली. या भेटीत उभयतांत दिलजमाई झाल्याचे चित्र होते. Ajit Pawar Vs Vijay Shivtare

गत विधानसभेत अजित पवारांनी शिवतारेंना ठरवून पराभूत केले होते. त्याची सल विजय शिवतारेंच्या (Vijay Shivatre) मनात अद्यापही खदखदत आहे. दरम्यान, राजकीय स्थिती बदलून अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. आता बारामती लोकसभेसाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र, पूर्वीची खदखद शिवतारेंनी लोकसभेनिमित्त बाहेर काढत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह अजित पवारांनाही आव्हान दिले होते. पवारांचा बदला घेण्याची हीच ती वेळ आहे, असा इशारा देत शिवतारेंनी लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली. याचा फटका महायुतीलाच बसणार असल्याचे जाणकार सांगत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लोकसभेत भाजपला 400 पार साठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. यातूनच 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित अजित पवार आणि शिवतारे यांच्याशी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचे समजते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिवतारे भूमिका मांडणार आहेत.

काहीही करून पवारांना धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या शिवतारेंचे बंड रात्रीच्या चर्चेनंतर शमल्याची चर्चा आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची माहिती आहे. आगामी विधानसभेत अजित पवार पुरंदरमधून मदत करतील, असा शब्द शिवतारेंना मिळाल्याचे समजते. दरम्यान, 'सरकारनामा'ने शिवतारेंचे हे बंड औटघटकेचे ठरणार असे भाकीत वर्तवले होते. आता शिवतारे आपल्या पत्रकार परिषदेत काय मत मांडणार याकडे लक्ष आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT