Dhairyasheel Mane : धैर्यशील मानेंचा पत्ता कट, शौमिका महाडिकांना संधी? हातकणंगलेत महायुतीचे गणित काय?

Hatkanangle Lok Sabha Constituency : महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वीच धैर्यशील माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने कोल्हापुरात चर्चेला उधाण
Dhairyasheel Mane, Shaoumika Mahadik
Dhairyasheel Mane, Shaoumika MahadikSarkarnama

Kolhapur Political News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी बऱ्यापैकी मतदारसंघ पिंजून काढला आहे, तर दुसरीकडे मात्र महायुतीचा उमेदवार कोण? यावर अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच आज गुरुवारी (ता. 28) महायुतीकडून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचा शब्द मिळाल्याने खासदार संजय मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

दरम्यान, हातकणंगले मतदारसंघ हा भाजपला सुटल्याचे सांगण्यात येत असल्याने त्या ठिकाणाहून शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता दाट झाली आहे. त्यामुळे खासदार मानेंचे टेन्शन वाढले असून, त्यांनी रात्रीच मुंबई गाठली आहे. तर दुसरीकडे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनीही महायुती आपल्याला गृहीत धरत नसल्याचे सांगून अपक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीत बेबनावाचे वातावरण झाल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mane, Shaoumika Mahadik
Lok Sabha Election 2024 : प्रस्थापितांचा प्रचार करणार नाही! आता सदाभाऊंनी वाढवलं युतीचं टेन्शन

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांचे नाव निश्चित झाले असले तरी हातकणंगलेबाबत अद्याप निर्णय झाला नाही. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याबाबत नाराजी असल्याचे पुढे येत आहे. त्यांचा जनसंपर्क कमी असल्याने सुरुवातीपासूनच त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खासदार मंडलिकांनी दबाव टाकून उमेदवारी मिळवल्याचे बोलले जाते. दरम्यान, आज महायुती आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २७) रात्री धैर्यशील माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेत चर्चा केल्याची समजते.

दरम्यान, कोल्हापूर किंवा हातकलंगले हा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न होता. कोल्हापूरची जागा शिवसेना शिंदे गटाला दिल्यानंतर हातकणंगलेच्या जागेवर भाजपकडून दावा केला जात होता. भाजपकडून शौमिका महाडिक यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी आमदार अमल महाडिक यांनी पुलाची शिरोली येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

महायुतीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairysheel Mane) यांचा पत्ता कट झाला, तर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनीही बंडाचे निशाण हाती घेत अपक्ष निवडणूक उतरले तर जिल्ह्याच्या राजकारणात बदल होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Dhairyasheel Mane, Shaoumika Mahadik
Ambadas Danve On BJP : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंचवीस टक्के दुसऱ्या पक्षातून आलेले.. दानवेंचा टोला..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com