Sharad Pawar, Cyrus Mistry Latest News
Sharad Pawar, Cyrus Mistry Latest News Sarkarnama
मुंबई

सायरस मिस्री हे माझ्या नंतरच्या पिढीच्या लोकांचे प्रतिनिधी होते; पवारांनी व्यक्त केलं दु:ख

सरकारनामा ब्यूरो

पुणे : या देशाच्या आर्थिक उभारणीमध्ये ज्या काही कुटुंबांनी अतिशय मोठे काम केलं त्यांच्यामध्ये पारशी समाजाचे अनेक लोक होते. त्यातलं एक नाव असं होतं जे काम जास्त प्रसिद्ध कमी करायचे ते म्हणजे मिस्त्री परिवार, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायरस मिस्त्री यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त व्यक्त केलं आहे.

आज (ता.४ ऑगस्ट) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात उद्योजक सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. सायरस यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आदरांजली वाहिली जात आहे. (Sharad Pawar, Cyrus Mistry Latest News)

पवार यांनी साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत सायरस मिस्त्री यांच्या बद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की मिस्त्री कुटुंबाची गुंतवणूक जास्त होती पण त्यांनी कधी ते बाहेर सांगितलं नाही. सुसंवाद, अत्यंत नम्र हे या कुटुंबाचं वैशिष्ट्य होतं. या कुटुंबाला पुढे न्यायची कुवत असलेलं नेतृत्व म्हणजे सायरस मिस्त्री. आज त्यांचा अपघात झाला हे अतिशय धक्कादायक वृत्त आहे. मिस्त्री कुटुंबासाठी हे धक्कादायक आहेच मात्र आजचा अपघात या देशात गुंतवणूक करणाऱ्या कुटूंबीयांच्या दृष्टीने मोठा धक्का आहे.

पवार पुढे म्हणाले की, सायरस मिस्री हे माझ्या नंतरच्या पिढीच्या लोकांचे प्रतिनिधी होते. त्यांचा माझी कन्या सुप्रिया आणि जावई सदानंद यांच्यासोबत त्यांचा घनिष्ठ संबंध होता. मात्र आज सायरस मिस्त्री ज्या पद्धतीने गेसे त्याचं दुःख सगळ्यांनाच आहे,अशा शब्दात पवारांनी दुःख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, रविवारचा दिवस भारतीय व्यापार क्षेत्रासाठी अत्यंत वाईट दिवस ठरला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळ अचानक लक्झरी कार दुभाजकावर आदळली आणि कारमधील चार जणांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी असलेल्या शापूरजी पालोनजी समूहाशी संबंधित असलेले सायरस मिस्त्री होते. हे सायरस मिस्त्री एकेकाळी टाटा समूहाचे अध्यक्षही होते. त्यांच्यासोबत मृत्यूमुखी पडलेली दुसरी व्यक्ती म्हणजे त्यांचा जवळचा मित्र जहांगीर दिनशॉ पंडोले. याच कारमध्ये आणखी दोन लोकही होते. त्यापैकी एक होते डॅरियस पंडोले आणि दुसऱ्या होत्या अनाहिता पंडोले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार ड्राईव्ह करणाऱ्या अनाहिता पंडोले होते. त्यांच्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT