Jayant Patil, Nawab Malik  sarkarnama
मुंबई

भाजपकडून सत्तेचा गैरवापर ; जयंत पाटील संतप्त

दाऊद इब्राहीम मनी लॉन्ड्रींग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी (D'gang probe)राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)आज सकाळी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate)ईडी (ED)कार्यालयात दाखल झाले आहेत. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप या आधीच भाजप नेत्यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टोक्तीही दिली होती. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

नवाब मोलिक यांच्यावरील या कारवाईनंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, ''नवाब मलिक काही दिवसापासून भाजप नेत्यांविरोधात काही प्रकरण बाहेर काढत आहेत. त्यांचा राग भाजप तपास यंत्रणांच्या माध्यमांतून राग बाहेर काढला जात आहे. कोणतीही नोटिस न देता ही चैाकशी सुरु आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहेत,''

सकाळी नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता पोहोचले. त्यानंतर नवाब मलिक हे सकाळी सात वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना ईडीने अटक अथवा ताब्यात घेतले नाही. दरम्यान, दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते. दाऊद इब्राहीम मनी लॉन्ड्रींग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ''नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याचे आताच प्रसारमाध्यमांकडून समजले. जर नवाब मलिक यांना ईडीने नोटीस दिले असेल तर त्याची उत्तरे नवाब मलिक देतील. त्यासाठी ते सक्षम आहेत. नवाब मलिक यांनी एक पत्रकार परिषद कालच घेतली. त्यानंतर लगेचच नवाब मलिक यांच्या घरी ईडीच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचणे हे आश्चर्यकारक आहे. भाजपकडून हे सुडाचे राजकारण सुरु आहे,''

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हणाले की ईडी ही स्वयात्त संस्था असली तरी ती राहिली आहे की नाही याबाबतच संशय निर्माण झाला आहे. पाठिमागे पाच वर्षात एकाही भाजप नेत्यावर कारवाई होत नाही. मात्र, विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्याने विरोधात जर काही बोलले तर लगेच त्याला ईडीच्या आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या नोटीसा पाठवायच्या. नवाब मलिक यांच्यासोबत घडत असलेला प्रकारही असाच आहे,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT