NCP Minister Nawab Malik
NCP Minister Nawab Maliksarkarnama

"नवाब मलिक सगळ्यांना पुरुन उरतील; उत्तर देणारे ते एकमेवचं"

NCP | Nawab Malik | ED : नवाब मलिक यांना ईडीने कार्यालयात नेले आहे.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांच्यावर आज सकाळी ईडीने कारवाई केली आहे. सकाळी ७ वाजता ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे. मात्र मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले असल्याचीही माहिती आहे. मलिक सध्या ईडीच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरु आहे.

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु असल्याचे ही कळत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांबाबत अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती.

NCP Minister Nawab Malik
मोठी बातमी; नवाब मलिकांच्या घरी ईडीचा छापा; २ तासांच्या कारवाईनंतर घेतले ताब्यात

मलिक यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, आज सकाळी चौकशीसाठी बोलावलं हे मला माध्यमांकडून समजले. त्यांना जर कायदेशीररित्या नोटीस असेल तर त्यांना जाणं भाग होतं. पण काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज लगेच ईडीचा छापा पडावा हे ठरलेले नियोजन आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

तसेच आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा हा डाव आहे, पण नवाब मलिक या सगळ्यांना पुरुन उरतील. भाजप हे सुडबुद्दीचे राजकारण खेळत आहे. मात्र या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी मलिकच पुरुसे आहेत, अशीही प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com