Jitendra Awhad, Dada bhuse, Eknath shinde
Jitendra Awhad, Dada bhuse, Eknath shinde  Sarkarnama
मुंबई

जितेंद्र आव्हाडांकडून दादा भुसेंचा 'तो' व्हिडीओ टि्वट; म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब, आता कुठला गुन्हा नोंदविणार.?

सरकारनामा ब्यूरो

Jitendra Awhad News: हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी एकवटली असून शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, मुख्यमंत्र्यांचं भूखंड प्रकरण, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं गायरान जमीन वाटप व वसुली प्रकरण यांसारख्या विविध मुद्द्यावरुन विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेत शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटवर मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भुसे हे एका कर्मचार्याला पोलिसांसमोर मारहाण करताना दिसत आहे. याचवरुन आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

'' मंत्री दादा भुसे फटकावतात,शिव्या देतात, मुख्यमंत्रीसाहेब आता कुठला गुन्हा पोलीस नोंदवून घेणार असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिसांसमोर मारले, माझा नग्न फोटोवर फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. मध्यरात्री त्या विकृताबरोबर सर्वोच्च न्यायालयात आपली बैठक झाली. आता बोला असं आव्हान देखील आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

'' पोलिसांची खोटी प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात द्यायला लावलीत. मी सराईत गुन्हेगार आहे असे पोलिस सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देतात. वाहसाहेब, आपण मला फाशी देऊ शकत नाही किंवा मुड्दाही पाडू शकत नाही.''

''माझ्याविरुद्ध जिने ३५४ दाखल केला. जिने रात्री आपली भेट घेतली. तिच्या विरुद्ध जबरदस्ती करुन छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे. आपण माझे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचलात.यावेळी आपण मित्र आहोत हेही विसरलात..'' असंही आव्हाड यांनी टि्वटमध्ये म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड हे अनंत करमुसे मारहाण प्रकरण आणि एका महिलेने विनयभंग प्रकरणी चांगलेच अडचणीत आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले होते. आता त्याच मुद्द्यांवरुन दादा भुसे यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री आता कोणती कारवाई करणार असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT