Baramati Agro Sugar Factory: बारामती अॅग्रो चौकशीप्रकरणी मोठी कारवाई; लेखापरीक्षक निलंबित

Baramati Agro : बारामती अॅग्रो साखर कारखान्याने १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते व आमदार राम शिंदे यांनी केला होता.
Ram Shinde, Rohit Pawar
Ram Shinde, Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati Agro Sugar Factory : कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजप नेते आणि आमदार राम शिंदे हे कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. याचदरम्यान, राज्य सरकारकडून यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, बारामती अॅग्रो साखर कारखान्याने १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते व आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीसाठी साखर आयुक्तालयातील चौकशी विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्यानं लेखापरिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश राज्य सरकारकडन सोमवारी (दि. 26) देण्यात आले आहेत. या आदेशात देशमुख यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Ram Shinde, Rohit Pawar
Sushma Andhare : '' शिंदे फडणवीस सरकारने काय खेळ लावलाय; उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला...''

साखर आयुक्तालयातील प्रथम चौकशी अधिकारी विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१) अजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु देशमुख यांनी विसंगत चौकशी अहवाल सादर केला होता. या प्रकरणी पुन्हा अपर निबंधक सहकारी संस्था पतसंस्था यांच्याकडून चौकशी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालात बारामती अॅग्रो कारखान्याने गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपूर्वी सुरू केल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यावरून देशमुख यांनी विसंगत अहवाल सादर करून राज्य सरकारची दिशाभूल केल्याची बाब निदर्शनास आली.

या अहवालानुसार शिस्तभंगाची कार्यवाही म्हणून लेखापरीक्षक अजय देशमुख यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारकडून आज जारी करण्यात आले.

Ram Shinde, Rohit Pawar
Ajit Pawar : 'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षपदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार? 'ही' नावे आघाडीवर

काय आहे प्रकरण?

बारामती अॅग्रो साखर कारखान्याने राज्य सरकारकडून निश्चित केलेल्या तारखेपूर्वीच गाळप सुरू केल्याचा आरोप भाजप नेते राम शिंदे यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारने या आरोपाची गंभीर दखल घेत या प्रकरणी साखर आयुक्तालयातील विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या चौकशीत विसंगत अहवाल दिल्याच्या कारणावरून विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात राज्य सरकारने सोमवारी आदेश जारी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com