Jain protesters at Dadar Kabutarkhana clash with police after tearing the BMC tarpaulin despite High Court order. FIR registered against 150 participants. Sarkarnama
मुंबई

Dadar Kabutarkhana : दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री काढणं जैन आंदोलकांच्या अंगलट, पालिकेच्या तक्रारीची वाट न पाहता अखेर पोलिसांची मोठी कारवाई

Jain Protesters FIR : दादर येथील कबुतरखाना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्याचा आदेश दिला होता. कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसांना आजारांचा धोका उद्भवत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी घातली होती.

Jagdish Patil

Dadar Kabutarkhana Protest Case : दादरमधील कबूतरखाना आंदोलन करणं आता जैन आंदोलकांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसत आहे. कारण पोलिसांनी पालिकेच्या तक्रारीची वाट न पाहता मोठी कारवाई केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता स्वतःहून दादर पोलीस ठाण्यात तब्बल 150 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणं आणि पोलिसांना न जुमानता बळजबरीने तिथे लावलेली ताडपत्री फाडणं आंदोलकांना महागात पडण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

दादर येथील कबुतरखाना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्याचा आदेश दिला होता. कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसांना आजारांचा धोका उद्भवत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी घातली होती.

मात्र, या कारवाईला जैन समाजाने तीव्र विरोध केला. न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबूतरखान्यावर जी ताडपत्री झाकली होती. ती जैन समाजाने मोठ्या संख्येने जमाव जमवून आंदोलन केलं त्यावेळी फाडली. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापट देखील झाली.

या सर्व घटनेचे राज्यभरात राजकीय पडसाद उमटले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई का केली नाही? असा सवाल केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी ते पालिकेच्या तक्रारीची वाट पाहत असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पालिकेकडून तक्रार न आल्याने पोलिसांनी स्वतःहून दादर पोलिस ठाण्यात 150 आंदोलकांविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT